स्री शक्तीचे राष्ट्रासाठी प्रेरणादायी सघोष संचलन

RSS

स्री शक्तीचे राष्ट्रासाठी प्रेरणादायी सघोष संचलन
सौ सुहासिनीताई रत्नपारखी | सौ. मनिषाताई सातभाई | सौ रेखाताई दाणी व्यासपीठावरून.

स्री शक्तीचे राष्ट्रासाठी प्रेरणादायी सघोष संचलन

     

नाशिक रोड - राष्ट्र सेविका समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे सघोष संचलनाचे आयोजन दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक रोड परिसरात करण्यात आले होते. शिखरेवाडी मैदान, गंधर्व नगरी, साने गुरुजी नगर, लोकमान्य नगर भागातून हे संचलन दुपारी ठीक ४.३० वाजता अर्थातच ही वेळ निश्चित करण्यात आली होती.

     व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या माननीय सौ. मनीषाताई सातभाई, प्रमुख वक्त्या माननीय सौ. रेखाताई दाणी, शहर कार्यवाहीका माननीय सौ. सुहासिनी रत्नपारखी या उपस्थित होत्या. 

       कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख वक्त्या माननीय सौ. रेखाताई दाणी यांनी संचलनाला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या, समितीच्या शाखेत सर्वांनाच मुक्त प्रवेश असतो. इथे कुणालाही कसलेच बंधन नाही. आपण सगळे एकाच समाजाचे घटक या नात्याने किंवा हीच भावना समितीच्या प्रत्येक स्थानावर आपणास बघायला मिळते. समितीमध्ये कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. हा समानतेचा, समरसतेचा भाव आपल्या हिंदू संस्कृतीत ,धर्मात आपल्या महान संतांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि हाच भाव समितीच्या सर्वच शाखांमध्ये जपला जातो. समितीच्या सेविका वेगवेगळ्या भाषिक मंडळांना प्रत्यक्ष जाऊन भेटी देतात. कधी मासिक मिलनाच्या निमित्ताने तर कधी तिळगुळ समारंभ प्रसंगी तिळगुळ देण्याचे निमित्ताने सर्वांना भेटतात, संपर्क साधतात, संवाद साधतात. रक्षाबंधनाच्या निमित्तानेही राखी बांधायला सेविका जात असतात. 

अशीच समानतेची जपवणूक ठेवून पथसंचलनाच्या निमित्ताने नाशिक रोड परिसरातील वेगवेगळ्या अन्य भाषिक मंडळांना यावेळी  सन्मानाने निमंत्रित केले होते.  यामध्ये मुख्यतः सिंधी, अय्यंगार ,लिंगायत, माहेश्वरी, गायत्री परिवार, धनगर समाज, शीख समाज अशा विविध मंडळांचा  समावेश बघायला मिळाला.  त्यावेळी या भगिनी अतिशय उत्साहात होत्या . आणि विशेष म्हणजे आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा भगवा ध्वज आणि त्या ध्वजाचे पूजन या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. आपण सगळे एक आहोत. आपल्यात समानता आहे हेच या पवित्र कृतीतून बघायला मिळाले. त्यानंतर लगेचच संचलनाला सुरुवात घोष वादनाने झाली. घोषाच्या तालावर एका लयीत पावले टाकत सेविकांनी अगदी शिस्तीत नियमात संचलन केले. संचलनाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्यांनी रस्ते सुशोभित करण्यात आलेले होते.संचलन  येत आहे याची सूचना देण्यासाठी मंगल वेशातील भगिनी नाक्यावर जाऊन शंखनाद करून घोषणा देत होत्या. फलकांनीही `संचलनाचे स्वागत, असे लिहून स्वागत केले होते.

बालाजी सोशल फाउंडेशन,स्वर साधना, गजानन महाराज मंडळ, बालाजी भजनी मंडळ तसेच अन्य मंडळांनी संचलनाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ठीक ठिकाणी संचलन मार्गावर भगव्या ध्वजावर पुष्पवर्षाव करूनही नागरिकांनी वंदे मातरम म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात संचलनाचे स्वागत केले. बाल , तरुण,  जेष्ठ अशा  सर्वच वयोगटातील सेविकांचा संचलनात मोठ्या उत्साहात सहभाग दिसून आला. समितीच्या गणवेशातील कच्छ परिधान केलेल्या सेविकांचा पहिला दंडधारी गण, तसेच शेवटी असणारा दंडधारी गण, घोषगण, डौलात फडकणारा भगवा ध्वज आणि ध्वजरक्षिका तसेच बालगण हे या संचलनाचे प्रमुख आकर्षण होते. भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. या संचलनात जेलरोड, नाशिक रोड, द्वारका,कॉलेज रोड, राजीव नगर, इंदिरानगर, गंगापूर रोड, पंचवटी, म्हसरूळ, ओढा, धृवनगर, प्रशांत नगर या नाशिक शहराच्या विविध भागातून एकूण ४१९ सेविकांचा सहभाग होता. संचलन स्थलावर संघ बंधू सेविका आणि इतर असे मिळून ६६८ जणांची उपस्थिती होती. 

१९३६ साली वर्धा येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. संपूर्ण भारतात समितीच्या शाखांच्या सेविकांचे संचलन हे वेगवेगळ्या कालावधीत होतच असते.           मार्गशीष शुद्ध सप्तमीच्या दिवशी महिलांचे आपल्या राष्ट्रासाठीचे हे शक्तिप्रदर्शन खूपच आनंददायी तसेच प्रेरणादायी ठरले. समितीच्या शहर शारीरिक प्रमुख माननीय सौ.कीर्तीताई जोशी, माननीय हर्षदा ताई कुलकर्णी माननीय सौ अश्विनीताई सोनवणे ( पवार ) यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन यशस्वीरित्या पार पडले संचलनाची सांगता सांघिक गीताने झाली.

 विश्व गगन मे गुंजे भारत 

 जय जय भारत जय जय भारत ॥ध्रु॥ 

विश्व गगन मे गुंजे भारत जय जय भारत जय जय भारत।।धृ।।

 

ज्ञान यहां की पवित्र गंगा, शील यहां की दिव्य संपदा धर्म प्राण यह देश हमारा, करे अर्चना, करे वंदना ।। 1 ।।

 

ऋषिमुनियों की तपस्थली यह, अमर वीरों की शौर्य भूमि यह सत्य मार्ग पर सतत चले हम, नित्य कामना, नित्य साधना।।2।।

 

योग धारणा कर्म कुशलता, नित्य करेंगे ध्येय साधना समरस सुखमय हो जग सारा, जगे भावना, जगे चेतना ।।3।।