तेजस्विनी पुरस्काराने राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांचा विशेष सन्मान:-

तेजस्विनी पुरस्काराने राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांचा विशेष सन्मान:-

तेजस्विनी पुरस्काराने राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांचा विशेष सन्मान:-

 शहरातील विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ऍंड. आकाश छाजेड आणि डॉ. अनुपमा मराठे यांच्या 'स्वराज प्रतिष्ठान तर्फे  तेजस्विनी पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला.

नाशिक : शहरातील विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा स्वराज प्रतिष्ठानकडून तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात, तणाव मुक्त जीवन, महिला सशक्तिकरण, नशा मुक्ती जीवन या संदर्भात वैशिष्ट्य पुर्ण कार्य केल्या बद्दल गंगापूररोडवरील नंदनवन लॉन्समध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व् विद्यालय, पंचवटीच्या संचालिका.राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्यांच्या अनुभव कथन मध्ये त्यांनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी (मुख्य संचालिका ब्रह्माकुमारीज नाशिक) यांनी सतत केलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर मी हा पुरस्कार मिळवू शकले असा विशेष उल्लेख केला.  

 विशेष प्रावीण्य मिळविलेल्या महिला, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी आपल्या कलाकौशल्याने नैपुण्य मिळवले, अशा महिलांचा सत्कार स्वराज फाउंडेशन नाशिकतर्फे करण्यात आला. नंदनवन लॉन्स येथे झालेल्या स्वराज उत्सवात या पुरस्कारांचे वितरण झाले.

जिल्हा एनएसयूआय व आरंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज तेजस्विनी पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

स्वराज फाउंडेशनचे संस्थापक आकाश छाजेड यांनी अवयवदान जागर कार्यक्रम करताना नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले. अवयवदान जनजागृती अशीच कायम सुरू राहील. आगामी काळात स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. लवकरच अवयवदान जागर जनजागृतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा नाशिकमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती स्वराज फाउंडेशनचे संस्थापक आकाश छाजेड यांनी दिली.

यावेळी विश्वास को- ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, प्रीतेश छाजेड, बाल हक्क आयोग सदस्य सायली पालखेडकर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वत्सलाताई खैरे, समीर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी नगरसेवक प्रशांत दिवे उपस्थित होते.

  • पुरस्कारार्थी

वत्सलाताई खैरे, ब्रह्माकुमारी पुष्पादीदी, कीर्ती भवाळकर, स्मिता झगडे, अश्विनी देवरे, दीपा ब्रोचा, ऋतुजा मुळे, सोनाली जोशी, शेख हीना इक्बाल, पल्लवी कुलकर्णी, सोनाली देशपांडे, श्रद्धा दुसाने, सई संघाई, कीर्ती गिते, डॉ. शीतल पगार, अस्मा सय्यद, माया काळे, सुवर्णा काळे, पलकिन शर्मा, डॉ. रेश्मा शेख.