नाशिक रोड ब्रह्माकुमारी संस्थेत विविध क्षेत्रातील महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार

नाशिक रोड ब्रह्माकुमारी संस्थेत विविध क्षेत्रातील महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार
नाशिक रोड ब्रह्माकुमारी संस्थेत विविध क्षेत्रातील महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार
नाशिक रोड ब्रह्माकुमारी संस्थेत विविध क्षेत्रातील महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार

नाशिक रोड - मनुष्य पासून देवता बनवणे नारीला श्री लक्ष्मी बनवणे हा या ईश्वरी विश्व विद्यालयाचा उद्देश आहे. महिला आपल्यातील सदगुणांनी श्री लक्ष्मी सिद्ध होऊ शकते. आज समाजात मोठ्या प्रमाणात  ताण तणाव निर्माण झाला आहे.  खूप मोठ्या प्रमाणात व्यक्ती डिप्रेशनच्या  आहारी जात आहे. अशा पार्श्वभूमीवर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे देण्यात येणारे ज्ञान निश्चितच व्यक्तीच्या व समाजाच्या अध्यात्मिक विकासासाठी पूरक ठरेल.  भगवंताची महिमा अपरंपार आहे.  जंगल ला लेखणी,  सागराला शाई,  आकाशाला कागद बनवा विद्येची देवी सरस्वती ही भगवंताचे ज्ञान लिहायला बसली तरीही भगवंताचे ज्ञान हे पूर्ण होणार नाही. मात्र भगवंताच्या या ज्ञानालाच साप्ताहिक कोर्स द्वारे व्यवस्थित रित्या समजता येऊ शकते यासाठी आपण हा साप्ताहिक कोर्स निश्चित करावा येथे कुठल्याही प्रकारचे शुल्क स्वीकारले जात नाही असे आवाहन ब्रह्माकुमारी मुख्य सेवाकेंद्र संचालिका  वासंती दीदीजी यांनी केले. 

येथील  नाशिक रोड ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे  “ब्रह्माकुमारी नारी शक्ती सन्मान 2023” चे आयोजन दिनांक २६ मार्च 2023 रोजी समारंभ पूर्वक करण्यात आले.  याप्रसंगी आदरणीय वासंतीदिदिजी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक तहसीलदार डॉ.  राजश्री अहिरराव, ब्रेव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका मीनल वाणी, इंडियन सेक्युरिटी प्रेस चे चीफ जनरल मॅनेजर राजेश बंसल,  ब्रह्माकुमारी शक्ती दीदी गोदावरी दीदी, साप्ताहिक नाशिक परिसर चे संपादक बीके दिलीप बोरसे आदी मान्यवर दीप प्रज्वलनासाठी उपस्थित होते.

प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित  तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी महिलांना स्वास्थ्य विषयक मार्गदर्शन व निरोगी राहण्याचे हेल्थ टिप्स दिले.  सोबतच महिलांनी आत्मविश्वास ठेवला व आपली दृढ इच्छा शक्ती असली तर आपले इच्छित साध्य होऊ शकते हे स्व अनुभव द्वारे  डॉ. अहिराव यांनी सांगितले. 

ब्रेव इंग्लिश मीडियम स्कूलच्या मीनल वाणी यांनी महिलांनी आपला सर्वांगीण विकास घडून आणावा,  महिलांना सर्व करता यायला हवं असे  अष्टपैलू व्यक्तिमत्व  धारण करावं. आपण आपल्या देशाचा अभिमान ठेवावा व आपल्या पुढच्या पिढीला आपल्याच देशाचा विकास घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करावे असे प्रतिपादन मीनल वाणी यांनी केले. 

इंडियन सेक्युरिटी प्रेस चे चीफ जनरल मॅनेजर राजेश बंसल यांनी सांगितले की नारी ही शक्ती स्वरूपा आहे व ती नेहमीच शक्ती स्वरूपाच असेल मात्र आज जे काही चुकीचे समाजात घडत आहे त्यासाठी आपण मुलांना समजाविले पाहिजे. आई वडील हेच मुलांना सुसंस्कार देण्यासाठी निमित्त असतात त्यामुळे मुलांना सुद्धा महिलांचा आदर करणेसाठी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. असे श्रीयुत  बंसल यांनी सांगितले 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. स्वरा मोरे हिने स्वागत नृत्य प्रस्तुत करून अनोखी दाद मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी उज्वला दीदी  यांनी तर प्रास्ताविक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी केले. कार्यक्रमात विविध महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांना ब्रह्माकुमारी संस्थेचा मानाचा नारी शक्ती सन्मान २०२३ प्रदान करण्यात आला.  यात अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थाच्या अध्यक्षा ज्योतीबहन ठक्कर, कलानगर महिला मंडळाच्या सुरेखा पेखळे, सिंधी समाज महिला अध्यक्ष ऋतिका कलानी, समाज सेविका राजनंदिनी अहिरे, स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या दिपाली चांडक, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगच्या सायली पालखेडकर,  एच बी टी हॉस्पिटलच्या मेट्रन आशा मुठाल, सेंट फिलोमना चर्च महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता थोरात,  रुचिका महिला मंडळच्या अध्यक्षा पुष्पा लाहोटी, राज्य परिवहन महामंडळ आगार वरिष्ठ व्यवस्थापक कल्याणी ढगे, इनरव्हील देवलाली कॅम्प अध्यक्ष भाग्यश्री आढाव, देवळाली जनकल्याणी फाउंडेशनच्या नाजनीन तारवाला आदी महिलांना 'ब्रह्माकुमारी नारीशक्ती सन्मान 2023'  ने सन्मानित करण्यात आले.

यासोबतच  विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना सफल उद्योजिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यात स्नेहा टेक्स्टाईल च्या प्रभा गंभीर,  हॅपी स्टेप प्ले स्कूलच्या लवीना साळवे,  मंजुश्री आयुर्वेदच्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रीती त्रिवेदी,  शार्प माईंड अकॅडमीच्या गीता चव्हाण,   रिच अकॅडमीच्या वंदना कांबळे,  लुक वेल मेकअप स्टुडिओच्या विशाखा खंडाळकर,  जॅक अँड जिल प्ले स्कूलच्या  तसनिम रामपुरावाला, कॉसमिटोलॉजिस्ट व स्किन हेअर एक्सपर्ट मोहिनी गुंजाळ, खत्री क्लासेसच्या रेखा खत्री, शहा क्लासेसच्या शोभा शहा, विद्या एम्पोरियमच्या संपदा बिर्ला, साईराज होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉक्टर शिल्पा लोळगे, यश ब्युटी पार्लरच्या अनिता बेदमुथा,  पोद्दार जंबो किड्स प्ले स्कूलच्या किर्ती चौधरी,  स्पीक इंडिया अकॅडमीच्या पूजा खंडारे, झिऑन प्ले स्कूलच्या शिल्पा जोश, जीवन रेखा गृह उद्योगच्या रेखा गांगुर्डे वेलनेस हबच्या अर्चना हटकर इत्यादी महिलांना सफल उद्योजिका हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर अखिल भारतीय अपंग पुनर्वसन संस्थेच्या मुख्याध्यापिका संगीता बोरसे,  श्रीराम कोचिंग क्लासेसच्या माधवी चिंतामणी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे महिलांच्या अनुभवांवर आधारित "नारीशक्ती सन्मान 2023" या पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी आदरणीय ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले,   या प्रकाशन सोहोळ्यात इतर प्रमुख पाहुण्यांसोबतच डॉक्टर हर्षल गुंजाळ,  व्यावसायिक देवा जाधव, देशोत्तम प्रकाशनच्या सुरेखा रवींद्र पाटील, साई धनवर्षा फाऊंडेशनच्या जानकी नाईक, टंडन एज्युकेशनच्या पूजा टंडन, वास्तुतज्ञ सुनिता टवरी, ओम शांती लाईट हाऊस चे बीके महेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमात मोठ्या संख्येने संबंधित पुरस्कार  प्राप्त संस्थेचे महिला सदस्य, ब्रह्माकुमारी संस्थेचे महिला सदस्य तसेच साप्ताहिक नाशिक परिसर चे सहकारी वृंद उपस्थित होते.

साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे तब्बल १०१ महिलांना ब्रह्माकुमारी नारीशक्ती सन्मान २०२३ ने गौरविण्यात आले. यात पंचवटी सेवाकेंद्र,  सिडको राणे नगर सेवा केंद्र, नाशिक रोड सेवा केंद्र, येवला व कोपरगाव येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रांमधून हा  नारी शक्ती सन्मान विविध क्षेत्रातील महिलांना घोषित झालेला आहे व वेगवेगळ्या दिवशी समारंभ पूर्वक हा सन्मान महिलांना प्रदान करण्यात आला. प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजन संबंधित ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्यांकडून यशस्वी रित्या करण्यात आले होते.