श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा १११वा पुण्यतिथी महोत्सव

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा १११वा पुण्यतिथी महोत्सव
नाशिक—नामसाधनेतुन मनःशांतीचा प्रसार हेच सर्वस्व मानणारे संत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव २१/१२/२४ ते२५/१२/२४ पर्यंत संपन्न होत आहे. गंगापुररोड वरील "श्रीं"मंदिराच्या भव्य व प्रशस्थ पांच मजली वास्तु निर्मिती नंतर प्रथमच हा महोत्सव होत आहे.या निमित्त २१ ते२३ डिसेंबरला सायंकाळी भजन सेवा,श्री विष्णु सहस्त्रनाम होईल.२४डिसेंबरला सायं साडेसहाला ह.भ.प.हर्षदबुवा जोगळेकर यांचे किर्तन होईल.
२५डिसेंबरला पहाटे पाच वाजे पासुन काकड आरती,गुलाल आरती,महापुजा,रुद्राभिषेक,सामुदायिक नामस्मरण,पुण्यतिथी किर्तन,महाआरती,महाप्रसाद आदी कार्यक्रम होतील.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्थांनी केले आहे.