दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्याची गरज: खा.शरदचंद्र पवार:अपंग विभागाकडून खा. शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांचा सत्कार

दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्याची गरज:  खा.शरदचंद्र पवार:अपंग विभागाकडून खा. शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांचा सत्कार
दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्याची गरज:  खा.शरदचंद्र पवार:अपंग विभागाकडून खा. शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांचा सत्कार

दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्याची गरज:

खा.शरदचंद्र पवार:अपंग विभागाकडून खा. शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांचा सत्कार 

नाशिक:प्रतिनिधी 

आज दिव्यांग व्यक्ती आपल्या अपंगत्वावर मात करत स्वतःला आत्मविश्वास, चिकाटीच्या जोरावर सिद्ध करत आहे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहानाची व विश्वासाची जोड देण्याची गरज आहे.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कायदा १९९५ व २०१६ कायदा प्रभावीपणे सर्वत्र अमलात आणण्याची आवश्यकता आहे.दिव्यांग व्यक्तींना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खा. शरदचंद्र पवार यांनी सांगितले.यावेळी पक्षाचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

       देशात तसेच राज्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य शरदचंद्र पवार साहेब करत आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दहा लोकसभा जागांपैकी आठ लोकसभा जागांवर चमकदार कामगिरी करत महाराष्ट्रात सर्वोत्तम स्ट्राईक रेट घडवला त्यानिमित्ताने खासदार शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस एसपी दिव्यांग सेल नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

      नाशिक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख,खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भास्कर भगरे सर,नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे खासदार डॉ.शोभाताई बच्छाव हे प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल  निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र,डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन (रामेश्वरम, राज्य-तामिळनाडू)  नाशिक जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दादा सोनवणे यांनी खासदार शरदचंद्र पवार आणि प्रदेश अध्यक्ष यांचाही बाळासाहेब सोनवणे यांनी सत्कार केला.

   

   बाळासाहेब सोनवणे यांचाही सत्कार:-

           यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिव्यांग सेल जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष  बाळासाहेब सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल खा.शरद पवार यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार करत जिल्ह्यात दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दिव्यांगांचे पुनर्वसन  करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सोनवणे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,खासदार शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे समवेत पदाधिकारी.