मुंबई नाका येथील शिवदर्शन भवनचा भव्य उद्घाटन सोहळा
ईश्वर प्राप्ती चे तहानलेल्या व्यक्तींना पुन्हा परमात्म्याच्या सन्मुख आणण्यासाठी या शिवदर्शन भवनची निर्मिती केलेली आहे.- राजयोगिनी संतोष दादिजी
.
*नाशिक- (दि. 13ऑक्टोबर)*
परमात्म्याच्या गुण व शक्तीवर आपला पूर्ण अधिकार आहे. हे गुण व शक्ती धारण केल्यास आपल्यातील वाईट विकार विचार रोग शोक नष्ट होऊन जातील. यातून आपण नक्कीच नव्या सत्ययुगी सृष्टीवर जाण्याचे लायक बनू. दुःखी कष्टी भरकटलेल्या व ईश्वर प्राप्ती ने तहानलेल्या व्यक्तींना पुन्हा परमात्म्याच्या सन्मुख आणण्यासाठी या शिवदर्शन भवनची निर्मिती केलेली आहे. या शिवदर्शन भवन मधून अनेकांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग लाभणार आहे. स्वतःचा तसेच परमात्मा चा सत्य परिचय यातूनच मिळणार आहे.
दुसऱ्या देशात जाण्यासाठी आपल्याकडील संपत्ती, मनी ट्रान्सफर करावे लागते त्याचप्रमाणे स्वर्गात जाण्यासाठी आपल्याकडील ही धनसंपदा उपयोगात पडणार नाही तर आपले श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ विचार श्रेष्ठ आचार आपल्याला समाजसेवेच्या रूपाने कार्यात लावावे लागतील यातूनच आपले पुण्य वाढेल व आपण आपली संपत्ती सूक्ष्म रूपाने नवीन दुनिये मध्ये घेऊन जाऊ शकू
ज्ञानाच्या आरशामध्ये आपले चरित्र बघावे , भगवंताने असे ज्ञान दिले की ज्यातून मनुष्य चे परिवर्तन देव माणसात झाले. देवता सुद्धा मनुष्यच आहेत मात्र त्यांच्यात दिव्य गुण असल्यामुळे त्यांना देव संबोधले जाते. आपण फक्त मंदिरात जाऊन गायन पूजन करायला नको तर त्यांचे आचरण सुद्धा धारण केले पाहिजे. भगवंत सांगतात की तुमच्यामध्ये खूप शक्ती आहेत यातून तुम्ही तुमच्या श्रेष्ठ कर्मांना श्रेष्ठ बनवा कारण आपण जसे विचार करू तसे आपण बनत जाऊ, ज्ञानाच्या आधारे आपल्या विचारांमध्ये परिवर्तन आणू शकतो. जसे संकल्प तसे कर्म व कर्म तसेच संस्कार असतात. संस्कारांनी संसार बनतो. संपूर्ण संसाराला परिवर्तन करायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी. *असे प्रतिपादन माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादीजी यांनी केले.*
दि. 13 ऑक्टोबर रोजी मुंबई नाका येथील इंदिरा नगर अंडर पास, कृष्णा हॉटेल सुचिता नगर येथे ब्रह्माकुमारी संस्थेचे नवनिर्मित शिवदर्शन भवन या सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा मुख्य सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी, आमदार सीमा ताई हिरे, श्रीकंठानंद स्वामी, संदीप युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. राजेंद्र सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत संबोधनात बी के वीणा दीदी यांनी सांगितले- राणेनगर येथील सेवा केंद्राची जागा साधक वाढल्यामुळे कमी पडत असल्याने नवीन जागेसाठी आम्ही शोध घेतला यात सेवा केंद्राच्या साधकांनी खूप चांगला सहयोग केला. जागा शोधण्यापासून ते परिपूर्णतेस येण्यापर्यंत सर्वांचे खूप चांगले सहभाग लाभला. ज्यांनी ज्यांनी या कार्यात आपला मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे मी याप्रसंगी ऋण व्यक्त करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय संतोष दीदीजी व वासंती दीदीजी यांनी या प्रकल्पास अनुमती देऊन मार्गदर्शन केले त्यामुळेच ही वास्तू इथे उभी राहू शकली आहे
आमदार सीमा हिरे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की महिलांसाठी बालकांसाठी तरुणांसाठी वृद्धांसाठी अशा समाजातील सर्वसाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे खूप चांगले कार्य चालू आहे. ठिकठिकाणी असे सेंटर होणे हे आपल्या नाशिक साठीच नव्हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी लाभदायक आहे. माउंट आबू मुख्यालय या ठिकाणी सुद्धा लाखो लोक जाऊन आपले जीवन उज्वल बनवत आहेत अध्यात्माची काय गरज व मेडिटेशन कसे करावे याचे खूप चांगले शिक्षण या ब्रह्माकुमारी सेवा केंद्र तर्फे देण्यात येत आहे. राजयोग मेडिटेशन हे जीवन सुखी करण्याचे खूप चांगले साधन असून भरकटलेल्या दुःखी कष्टी व तणावात असलेल्या लोकांना चांगल्या मार्गावर आणण्याचे हे एक खूप मोठे माध्यम आहे.
संदीप युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. राजेंद्र सिन्हा यांनी सांगितले की आपल्या जीवनाचे लक्ष समजणे आपण कोण आहोत हे समजून घेणे आपले जबाबदारी काय आहे हे समजून घेणे हे जाणीव करून देण्याचे कार्य ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे करण्यात येत आहे. समाजाला उच्च स्तरावर पोहोचवणे श्रेष्ठ बनवण्याचा जिम्मेदारी या संस्थेने घेतलेली आहे देशाने भले कितीही प्रगती केली असेल मात्र श्रेष्ठ समाजाची निर्मिती होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. सामाजिक पार्श्वभूमीवर बघितल्यास लक्षात येते की देशभरात खूप खूप कृत्य होत आहेत समाज आपल्या निश्चितम अवस्थेला गेलेला आहे या यावर तोडगा म्हणजे आध्यात्मिकता होय मात्र अध्यात्मिकता म्हणजे फक्त पूजन पाठण करणे नाही तर स्वतःला व परमात्म्याला ओळखणे व त्या मार्गाने चालणे म्हणजे अध्यात्मिकता होय.
श्रीकंठानंद महाराज यांनी सांगितले तुम्हाला बघितल्यानंतर लोकांना वाटले पाहिजे की यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे तुमचं वागणं चालणं बोलणं वागणं हे शिवदर्शन्मय असले पाहिजे नाशिक मुंबईला कनेक्ट करते त्यामुळे शिवदर्शन चा हा प्रवाह नाशिक ते मुंबई पर्यंत असला पाहिजे नाशिकच्या प्रत्येक रस्त्यावर गल्लीवर शिवदर्शनाची अनुभूती होणे आवश्यक आहे व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची तर ती जबाबदारी आहे मात्र समोर बसलेले आपण सुद्धा प्रापंचित आहात आणि तुम्हाला सुद्धा प्रपंच व्यवस्थित ठेवायचा असेल तर तुमच्या जीवनात शिवदर्शन असणे खूप आवश्यक आहे
बी के नितीन भाई यांनी प्रसंगी सांस्कृतिक मनोरंजनातून सर्वांना उत्साहित केले. यांत बिके ओमकार भाई यांनी खूप चांगली साथ संगत दिली. सेवाकेंद्रात नियमित येणाऱ्या छोट्या कन्यांनी नृत्य द्वारा स्वागत, कुं अनुश्री ने कत्थक नृत्य द्वारे स्वागत केले
स्वागत संबोधन बी के वीणा दीदी यांनी केले.सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी उज्वला दीदी यांनी तर आभार बी के विकास भाई यांनी मानले.
दीप प्रज्वलनसाठी उपस्थित विशेष पाहुणे
मुंबई नाका पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संतोष नरूटे, नगर सेविका पुष्पा ताई आव्हाड, कपालेश्वर मंदिराच्या ट्रस्टी श्रद्धा दुसाने , नाशिक टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य सरप्रीतसिंग बल मदनलाल पारख, नगर सेविका किरण ताई गामने, डॉ अभिनंदन कोठारी, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे लोकेश पारक, माउंट आबू येथून विशेष अतिथी म्हणून ब्रह्माकुमार जितूभाई व ब्रह्माकुमार नितीन भाई, ब्राहमकुमार अजय भाई, पनवेल तारादीदी, उल्हासनगरच्या सोम दीदी, सायन माला दिदी, पिली बंगा राणी दीदी, मालेगाव ममता दीदी, कोपरगाव सरला दीदी, पुष्पा दीदी बऱ्हाणपुर मंगला दिदी, नाशिक च्या शक्ती दीदी गोदावरी दीदी मनीषा दीदी आरती दीदी, मीरा दीदी राणी दीदी, आदी समर्पित भगिनी उपस्थित होत्या.