नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज मध्ये NIMBASH २०२५: सांस्कृतिक कार्यक्रम उत्सहात साजरा

नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज मध्ये  NIMBASH २०२५: सांस्कृतिक कार्यक्रम   उत्सहात साजरा

नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज मध्ये

NIMBASH २०२५: सांस्कृतिक कार्यक्रम

 उत्सहात साजरा

उद्घघाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष देशमुख, चेअरमन श्रीमती विजया देशमुख, कार्यकारी संचालिका कु. शिरीन देशमुख आणि महाविद्यालयाच्या प्रभारी संचालिका डॉ. शिंदे सुवर्णा यांच्या शुभहस्ते

नाशिक, १९ जानेवारी २०२५: नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये १३ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत NIMBASH २०२५ हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कला गुण आणि प्रतिभा सादर केली.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष देशमुख, चेअरमन श्रीमती विजया देशमुख, कार्यकारी संचालिका कु. शिरीन देशमुख आणि महाविद्यालयाच्या प्रभारी संचालिका डॉ. शिंदे सुवर्णा यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक महत्त्व, सृजनशीलता आणि एकात्मतेचा संदेश दिला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ट्रेझर हंट स्पर्धेने सुरुवात झाली, जिथे विद्यार्थ्यांनी आपल्या टीमवर्क आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा प्रत्यय दिला.

दरम्यान, बॉलीवूड डे आणि रेट्रो डे या दिवसांनी विद्यार्थ्यांमध्ये अनोखी उत्साहाची लाट निर्माण केली. पारंपरिक डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय सांस्कृतिक परंपरेला साजेशा पोशाखात सहभाग नोंदवला. बुद्धिबळ आणि कॅरम यांसारख्या खेळांच्या स्पर्धांनी विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि रणनीती कौशल्याला वाव दिला, तर क्रिकेट स्पर्धेने मैदानी खेळांमधील ऊर्जा आणि टीमवर्क दाखवून दिले.

नृत्य आणि फॅशन शो या सांस्कृतिक सादरीकरणांनी महोत्सवात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य कौशल्य आणि फॅशनद्वारे आपली कला प्रकट केली. या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मिस्टर आणि मिस NIMBASH २०२५ चा किताब, जो विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय सहभाग आणि उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर प्रदान करण्यात आला.

महोत्सवाचा समारोप दिमाखदार समारंभाने झाला. या महोत्सवाने नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सर्जनशीलता, सांघिकता आणि सांस्कृतिक परंपरांचा गौरव केला. विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून स्मरणीय अनुभव व मैत्रीपूर्ण बंध निर्माण करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमास विद्यार्थी समन्वयक ऋषिकेश धडीच, क्रीशिता पांडीयन, मेघना दोंदे, ललित साळुंके, सागर दुसाने व अक्षिता सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.