अंतर्बाह्य हादरुन टाकणारे दोन अंकी नाटक- “ काचवा”

अंतर्बाह्य हादरुन टाकणारे दोन अंकी नाटक- “ काचवा”

 अंतर्बाह्य हादरुन टाकणारे दोन अंकी नाटक- “ काचवा”

 

डॉ. किरण कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले दोन अंकी "काचवा" हे नाटक वाचनात आले आणि मी अंतर्बाह्य हादरुन गेले. लहान कोवळ्या मुलीवर नुकत्याच वयात आलेल्या मुलाने केलेला अतिप्रसंग तिच्या आयुष्यावर आणि मानसिकतेवर कसे परिणाम करतो ह्याचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे "काचवा" । प्रेक्षकाला लैंगिकतेबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल विचार करायला भाग पाडणारे हे नाटक आहे.

 

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरची काचेची नक्षी आणि पहिल्याच पानावरची "काचवा" ही कविता विषयाची गभीरता जाणवून देतात. नायिकेच्या मनोभूमीवर घडणारा कोर्टरुम ड्रामा केवळ अप्रतिम! नायिकेच्या आयुष्यावरचा लहानपणी अनुभवलेल्या वाईट प्रसंगाचा परिणाम किती खोलवर आहे, हे जाणवून देणारी पात्र योजना नाट्याला वेगवेगळे पैलू देते. अशी नाटके मराठी रंगभूमीला समृध्द करतात आणि सामाजिक विषयाची जाणीव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. म्हणूनच, अशा नाटकांचे अधिकाधिक प्रयोग व्हायला हवेत. गावोगावच्या नाट्यमंडळांनी आणि कॉलेजमधल्या युवक - युवतींनी ही संहिता वाचावी, अभ्यासावी आणि रंगभूमीवर सादर करावी, अशी अपेक्षा ।

 

मोवाईल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आला, त्याआधीच्या काळातले हे नाटक असले, तरी त्यात मांडलेले मुद्दे कालबाह्य झालेले नाहीत, हे विशेष ।

श्री प्रमोद कुलकर्णी - ९७६३०४८७२२