नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नाशिक तर्फे पूल कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे संपन्न

नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नाशिक तर्फे पूल कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे संपन्न

नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नाशिक तर्फे पूल कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे संपन्न

नाशिक, शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ – नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नाशिक तर्फे पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या ड्राईव्हमध्ये ‘बिझास्त्रा प्रायव्हेट लिमिटेड’, ‘सेव्हन ५२ रिक्रूटर्स’ आणि ‘पोर्टर’ या तीन नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. कॅम्पस ड्राईव्हमध्ये नाशिक आणि परिसरातील विविध व्यवस्थापन महाविद्यालयांतील तब्बल २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कंपन्यांनी अकाउंटंट, प्रशासकीय सहाय्यक, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आणि ट्रेनी बिझनेस असोसिएट या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली.

या कॅम्पस ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये विद्यार्थी समन्वयक, प्राध्यापक वर्ग आणि नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रभारी संचालिका डॉ. शिंदे सुवर्ण राहुल यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मिळालेल्या या अनोख्या संधीबद्दल सहभागी कंपन्यांनी आणि विद्यार्थ्यांनी कौतुक व्यक्त केले.

नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तर्फे भविष्यातही अशा प्रकारच्या प्लेसमेंट ड्राईव्हच्या आयोजनासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष श्री. सुभाष देशमुख, चेअरमन श्रीमती विजया देशमख आणि कार्यकारी संचालिका कु. शिरीन देशमुख यांनी व्यवस्थापनाच्या वतीने जाहीर केले.