कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे गांधी जयंतीदिनी कृतार्थ पुरस्कारांचे शानदार वितरण
कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे कृतार्थ पुरस्कारांचे शानदार वितरण
नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने, आछ गांधी जयंतीदिनी, शहर व जिल्ह्यातील यशस्वी क्लासेससंचालकांच्या आईवडीलांना व इतर ज्येष्ठ नागरिकांना " कृतार्थ पुरस्कार " देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण लोखंडे, रोटरीचे अध्यक्ष सीए प्रफुल्ल बराडिया, इडोफॉक्सचे अजिंक्य कुलकर्णी, सवानी युनिव्हर्सिटीचे हार्दिक गोसावी हे उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण लोखंडे म्हणाले, " यशस्वी व्यक्तीमागे त्याच्या मातापित्यांचे योगदान मोठे असते. आईवडीलांचा सन्मान हा संघटनेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे"
, कृतार्थ पुरस्कार प्रदान करुन यांचा झाला सन्मान - रामेश्वरजी व सविता काबरा, सुरेश व उषा कपिले, शांता गणपत तिडके, पुष्पा रविंद्र शिंदे, निंबाजी राकडे, सोमनाथ, रामसिंग व इंदूबाई राठोड, जयप्रकाश व मंजु तिवारी, नामदेव व वत्सला सपकाळे, लक्ष्मीबाई रघुनाथ कोतकर, आनंदा व लक्ष्मी जगताप, अशोक व सुलोचना जाधव, राजेंद्र व सुरेखा खाबिया, चंद्रावती विश्वकर्मा, रणजीत व सुधा शेवाळे, जयप्रकाश व कला आचलिया, सतीश व अनघा जोगळेकर, प्रभावती वसंतराव क्षत्रिय, प्रकाश व विना जोशी अच्चन्ना, शुभदा जोशी, रघुनाथ ठाकरे, नरसिंग व प्रभा जोशी यांना कृतार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . सुत्रसंचलन अशोक देशपांडे व प्रतिभा देवरे यांनी केले. कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष अरुण कुशारे, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, अतुल आचळे, सांस्कृतिक विभागप्रमुख पवन जोशी , रविंद्र पाटील, शिवाजी कांडेकर, स्वाती जगताप, निलेश दूसे, शशिकांत तिडके, प्रमोद गुप्ता, वाल्मिक सानप, प्रकाश डोशी, लोकेश पारख, आरती खाबिया, प्रतिभा देवरे , मनोज काबरा, गणेश कोतकर, पराग घारपुरे, रवि यादव, पंकज देशमुख, , दुर्गेश तिवारी, रमेश ठाकरे, धनंजय ढाकणे, उमादेवी जितेंद्र विश्वकर्मा, रवि यादव, दिपक गुप्ता, सचिन जाधव, सचिन अपसुंदे, विष्णू चव्हाण, किशोर सपकाळे, यशवंत भामरे, शशिकांत तिडके, माधवी चिंतामणी, विद्या राकडे, सुदाम क्षत्रिय, किशोर क्षत्रिय, विलास निकुंभ, आदी क्लासेस संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.