साप्ताहिक नाशिक परिसर मधून अनेकांचे मंगल झाले आहे - ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी
साप्ताहिक नाशिक परिसर मधून अनेकांचे मंगल झाले आहे - ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी
साप्ताहिक नाशिक परिसरच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
नासिक रोड- बीके दिलीप भाई यानी जेव्हा पासून साप्ताहिक नाशिक परिसर सुरू केला त्यात अनेकांचे मंगल झाले आहे. वाचकांना हा पेपर निःशुल्क तर मिळतोच परंतु यातील जाहिरातदारांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असतो. आम्हालाही यात ब्रह्माकुमारी संस्थेविषयी टाकण्यात आलेली माहिती वाचून अनेकांचे फोन येतात व मेडिटेशन साठी विचारणा होत असते अशा या वृत्तपत्राची दिनदर्शिका प्रकाशित झाली असून यातून चांगली सेवा घडेल, अशी मी शुभ भावना व्यक्त करते. असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी व्यक्त केल्या
नूतन वर्ष शुभारंभ प्रसंगी दिनांक १ जानेवारी रोजी साप्ताहिक नाशिक परिसरच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा येथील सेंट फिलोमिना स्कूलच्या समोर स्टेट बँकेच्या वर जेलरोड येथील ब्रह्मकुमारी राजयोग सेवा केंद्रात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदींच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माने मॅंगो फार्म हाऊस चे संचालक श्री संजय माने व एस जी किचनच्या संचालिका सौ. पद्मजा माने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात संपादक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी सांगितले की साप्ताहिक नाशिक परिसराच्या उपक्रमांचा उद्देश समाजात मूल्यांची स्थापना करणे आमंत्रित पाहुण्यांना ब्रह्माकुमारी संस्थेचा संदेश देणे व त्यांना जीवनात खरी सुख शांती कशी मिळवता येईल याचा मार्ग दाखवणे हा आहे. साप्ताहिक नाशिक परिसराचा उदय हा ईश्वरीय सेवेसाठीच झालेला आहे असेही संपादक बोरसे यांनी याप्रसंगी नमूद केले
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ. पद्मजा माने यांनी सांगितले की साप्ताहिक नाशिक परिसर सोबत आमचा ऋणानुबंध गेल्या पंधरा वर्षापासून आहे आम्ही यात अतिशय वाजवी दरात जाहिरात टाकत आलो आहोत व बोरसे यांनीही अतिशय विनम्रपणे आम्हाला सेवा प्रदान केलेली आहे. साप्ताहिक नाशिक परिसर ची प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशा शुभेच्छा माने मॅडम यांनी याप्रसंगी दिल्या.
मँगो फार्म हाऊसचे संचालक श्रीयुत माने यांनी सांगितले की आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळात लोकांच्या संवेदना हरवत चाललेले आहेत एखादी गोष्ट वाचली असता ती दीर्घकाळ बुद्धीमध्ये रेंगाळत असते मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून बघितलेल्या गोष्टी लगेच विसरल्या जातात त्यामुळे आजही प्रिंट मीडियाचे बलस्थान ओळखून साप्ताहिक नाशिक परिसरने आपला उपक्रम चालू ठेवला आहे, याबद्दल माने यांनी नाशिक परिसर चे कौतुक केले.
कार्यक्रमात उपस्थित निवृत्त रेल्वे अभियंता सुरेश शेवरा यांनी साप्ताहिक नाशिक परिसराच्या वाटचालीस शुभेच्छा देत नूतन वर्षाच्याही शुभेच्छा दिल्या…
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमारी शक्ती दिदी यांनी पाहुण्यांना ईश्वरी भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन साप्ताहिक नाशिक परिसराच्या स्टाफ सचिन मोरे राजेश जाधव गणेश लोहार अशोक सूर्यवंशी रवी सोनवणे आदींनी उत्तम प्रकारे केले