ओझर, शिंपीटाकळी, दारणासांगवी येथे विविध विकासकामांचे अनिल कदम यांच्या हस्ते लोकार्पण

शिंपीटाकळी येथे रस्त्याचे लोकार्पण करताना माजी आमदार अनिल कदम समवेत पदाधिकारी व ग्रामस्थ.

निफाड (वार्ताहर) :- निफाड तालुक्यातील शिंपीटाकळी, दारणासांगवी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्णत्वास गेलेल्या दोन्ही रस्त्यासह पर्यटन योजनेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ओझर येथील कामांचेही भूमिपूजन अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. दारणासांगवी येथील महादेव मंदिर सुशोभीकरन करणे व 

शिंपीटाकळी मारुती मंदिर सुशोभीकरन करणे या कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. चांदोरीचे मा.सरपंच संदीप टरले यांनी पर्यटन विकास योजनेच्या या कामांसाठी पाठवपुरावा केला होता. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास चांदोरीचे सरपंच विनायक खरात, शिवा लोखंडे, सरपंच सुनील फड, रावसाहेब गोहाड, 

कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र बोडके, रमेश काळे, सोमनाथ लोखंडे, सुभाष लोखंडे, नारायण लोखंडे, बाजीराव बोडके, विश्वनाथ बोडके, बाळासाहेब फड, शरद गोहाड, बाळू बोडके, सुनील साळवे , रंगनाथ कर्पे, गोपी मुळक, परवेझ शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

          ओझर येथील मोंढे वस्ती पुलाचे उद्घाटन व विनस कॉम्प्लेक्स जवळील रस्त्याचे डांबरीकरण तसेच स्वामी समर्थ मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक टाकने या कामांचेही भूमिपूजन अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश शेजवळ जेऊघाले काका, रघुनाथ शेजवळ, मधू अहिरे, अंबादास वाघ, सूर्यवंशी काका, शब्बीर खाटीक, प्रकाश फुगत,  पुंडलिक शेजवळ, प्रितीश मोरे शरद शेजवळ, भाऊराव शेजवळ, विष्णू शेजवळ ,भारत शेजवळ, संजय शेजवळ, प्रदीप शिंदे, सौ.कविता कुलथे, मनोज कुलथे, मधुकर कुलथे, कुसुम कुलथे, हर्षद कुलथे, रसिका कुलथे, ऋषिकेश हांडे, कमल रामदास हांडे, संदीप राऊत, आनंद वाघ, संगीता वाघ, दत्ता वाघ, सविता वाघ, प्रदीप कुलथे, उर्मिला कुलथे, विनायक बोराडे, एकनाथ रकिबे, जयश्री रखिबे, जिजाबाई धुळे, माधव धुळे, मुकेश पटेल, दक्षा पटेल, पंकज ढिकले, कांतीभाई पटेल, संदीप पूजा पटेल, शिव तिवारी, प्रियांका सोनू गौतम, सुमित शिंदे, अमित रंजन, अन्सार बादशाह मलाज, आयशा मलाज, जयश्री रेकिडे यांच्यासह स्वामी समर्थ नगर  व शेजवळवाडी तसेच भगतसिंगनगर मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.