दिव्यांगांसाठी १० हजार पेन्शन करावी:- बाळासाहेब सोनवणे
दिव्यांगांसाठी १० हजार पेन्शन करावी:- बाळासाहेब सोनवणे
दिव्यांगांसाठी १० हजार पेन्शन करावी:- बाळासाहेब सोनवणे
स्वावलंबनासाठी तालुकास्तरावर दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारावे
नाशिक: - संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना एक हजार रुपये अनुदान सध्या शासनाच्यावतीने देण्यात येत आहे.परंतु या अनुदानात वाढ करून दरमहा दहा हजार रुपये करून दिव्यांग स्वावलंबनासाठी तालुकास्तरावर अपंग पुनर्वसन केंद्र उभारावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्ष दिव्यांग सेल नाशिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
देशामध्ये महाराष्ट्रात प्रथम दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले असून दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसत नाही तसेच दिव्यांगांबाबत ठोस निर्णय घेतले जात नाही.आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सरकार येताच दिव्यांगांना प्रतिमहिना सहा हजार रुपये पेन्शन लागू केली आहे.आंध्रप्रदेश मध्ये दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य असून दिव्यांगांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.सरकार दिव्यांगांना दरमहा एक हजार रुपये देते पण चार चार महिने दिव्यांगाच्या खात्यामध्ये जमा होत नसून दिव्यांगांना मोठ्या संकटांना सामना करावा लागतो.दिव्यांग व दिव्यांग बेरोजगारांच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून त्या सरकारने ओळखून,समजून घेऊन प्रतिमहा दहा हजार रुपये पेन्शन दिल्यास कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचा सांभाळ होऊ शकतो.मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांचे लग्नही होत नाही तसेच ज्या दिव्यांग बांधवांचे आई-वडील असतात ते सांभाळ करू शकतात परंतु आई-वडील नसल्यास सरकारने दरमहा दहा हजार रुपये पेन्शन दिल्यास बहीण भावंडे चांगल्या पद्धतीने सांभाळ ही करू शकतील आणि सन्मानही ठेवतील.
दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अपंग पुनर्वसन केंद्र उभे करून संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग बांधवांसाठी दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी केले.
सरकारने दिव्यांगांनाही न्याय द्यावा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून आता नुकतीच लाडक्या भावांसाठी खास योजना आणल्या आहेत.ही बाब स्वागतार्य असून तसेच राज्यातील अल्पदृष्टी-अंध, कर्णबधिर,मूकबधिर, अस्थीव्यंग,मतिमंद,सेरेबल पाल्सी इत्यादी प्रकारच्या दिव्यांग व दिव्यांग बेरोजगारांच्या खूप समस्या असून महत्वपूर्ण समस्या म्हणजे दरमहा दहा रुपये पेन्शन मिळाल्यास आर्थिक टंचाई दूर होईल.तसेच राज्याच्या सर्व शासकीय निमशासकीय विभाग,अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये अपंगाचा भरती-पदोन्नती ४% अनुशेष भरण्यात यावा. |