निरोगी आणि औषध मुक्त जीवनासाठी सनराज वेलनेस स्टुडिओ कटीबद्ध

निरोगी आणि औषध मुक्त जीवनासाठी सनराज वेलनेस स्टुडिओ कटीबद्ध

निरोगी आणि औषध मुक्त जीवनासाठी सनराज वेलनेस स्टुडिओ कटीबद्ध

सौ राजश्री संतोष झाल्टे गेल्या तीन वर्षापासून  आरोग्य विषयी सखोल माहिती घेऊन आरोग्य दूत म्हणून काम करत आहे

नाशिक रोड मधील सामाजिक संस्था सनराज फाउंडेशन यांच्या सामाजिक बांधिलकी मधून सनराज वेलनेस स्टुडिओ हा दिनांक 3 मार्च 2024 रोजी नाशिक रोड हे नाशिक पूर्वचे  माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सनराज वेलनेस स्टुडिओ चे मालक सौ राजश्री संतोष झाल्टे गेल्या तीन वर्षापासून  आरोग्य विषयी सखोल माहिती घेऊन आरोग्य दूत म्हणून काम करत आहे या क्लब मध्ये मोफत आरोग्य तपासणी सोबत योगा,  एरोबिक झुंबा मोफत व्यायाम करून घेतले जातात याच सोबत माणसाचा आहार कसा असावा,  पाणी किती प्यावे, काय खावे,  कधी झोपावे याबद्दल विनामूल्य मार्गदर्शन तसेच धकाधकीच्या जीवनात येत असलेल्या आजारांपासून आपल्या आरोग्याला कसे चांगले ठेवता येईल यावर उपाय सुचवले जातात.  लहान मुलांची प्रतिकारशक्ती हवामान बदलामुळे होणारे सर्दी खोकला तसेच क्रीडा क्षेत्रातील मुलांसाठी आहार कसा असावा यावर तज्ञ डॉक्टर तसेच आरोग्य सल्लागारांकडून मार्गदर्शन,  महिलांना  मासिक पाळीतील तक्रारी तसेच मासिक पाळी अनियमित असल्यामुळे येत असणाऱ्या समस्या थायरॉईड, मायग्रेन यावर सल्ला आणि मार्गदर्शन अगदी सोप्या पद्धतीने सांगितले जातात चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजारापासून मुक्त कसे होता येईल आणि सकस आणि पौष्टिक आहार जीवनासाठी किती आवश्यक आहे सध्या आपण खात असलेलं अन्न आणि यावर वापरण्यात येणारे केमिकल यामुळे मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर  500 पेक्षा जास्त डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन दिले जाते आपले शरीर हीच आपली संपत्ती आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लोकांना जागरूक करणे हेच सनराज वेलनेस स्टुडिओचे प्रमुख काम आहे तुम्हाला कुठल्याही आरोग्य विषयीच्या अडचणीसाठी सल्ला आणि मार्गदर्शन तुम्ही त्यांच्या स्टुडिओत जाऊन घेऊ शकतात पत्ता सनराज स्टुडिओ राजेंद्र कॉलनी नाशिक रोड पोलीस स्टेशन समोर नाशिक रोड नाशिक - 899023150