झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन

झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन
झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन

झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन

देवळाली कॅम्प : नाशिकरोड येथील झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने सर्व आठही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत  एकहाती सत्ता काबिज केली.

सिंधी समाजाची आर्थिक नाडी असलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नाशिकरोडच्या कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात मंगळवारी (दि. १३) पार पडली. सकाळी ८ पासून सभासद मतदारांनी मतदानासाठी सुरुवात केली. दुपारी ४ पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मतदान शांततेत पार पडले. सायंकाळपर्यंत एकूण १६ टक्के मतदान झाले. यानंतर ५ वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत ८ जागांसाठी परिवर्तन व नम्रता अशा दोन पॅनलचे १६ उमेदवार रिंगणात उतरले होते. हेमंत वजिरानी यांच्या परिवर्तन आणि राम साधवानी यांच्या नम्रता पॅनल यांच्यात लढत झाली. ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार अशी चर्चा असताना मतदारांनी परिवर्तन पॅनलला बहुमत देत पतसंस्थेत 'परिवर्तन' घडवून आणले. निकाल जाहीर झाल्यानंतर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले आणि मतदारांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही सर्व नक्कीच पार पाडणार आहोत, टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे विजयी उमेदवारांनी सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन, राकेश सोनवणे, शैलेश पोतदार, हेमंत मार्साळे, कैलास आढाव, महेंद्र गुप्ते, झुलेलाल पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश जाधव आणि टीमने योग्य नियोजन केल्याने निवडणूक शांततेत पार पडली.

Files