महावीर इंटरनॅशनलचा स्त्री कर्तुत्वाला सलाम.....
महावीर इंटरनॅशनलचा स्त्री कर्तुत्वाला सलाम.....
नाशिक प्रतिनिधी :८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महावीर इंटरनॅशनल नाशिक तर्फे नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील असामान्य कार्य करणाऱ्या १२० महिलांचा सुकन्या पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्लोबल युनायटेड लाईफटाईम क्विन डॉ.नमिता कोहोक यांना त्यांच्या अनमोल कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महावीर सुकन्या रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते मा. मधुकर साहेब यांना गोल्डन आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या कार्यकर्तृत्वाचा अवीट ठसा उमटविणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान,प्रविणा मोदी, लिना चोपडा,संगिता गन्ना, कोकीला जव्हेरी, सुवर्णा काले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, हिंदुस्तान लिव्हरच्या मालक उषा शाह या अथितींच्या प्रमुख उपस्थितीत ब्रह्माकुमारी नीता दीदी, ब्रह्मकुमारी अनुराधा दीदी,ब्रह्माकुमारी दिपाली दीदी,वैशाली बढे, विद्या खरात, सुनंदा कापडणीस, स्नेहा मोडक, उषा शाह, राणी दशमुखे, पूजा ठोले, प्रिया छाजेड, मृणाल कोथेकर, मनीषा चौधरी,राजनंदिनी अहिरे, आयुषी पाटणी, कविता जैन, कोमल खिवंसरा, कृषिका चोरडिया, तृप्ती खिवंसरा, उज्वला माजगांवकर, मनिषा कोठारी, मिना सामर, अल्पा भन्साळी, सुवर्णा काले, पुनम मुथा, अनिता खिवंसरा, रिझवाना शेख या महिलांना सुकन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अथितींनी स्त्री जगाची निर्माता आहे, कुटुंबाच्या जडणघडणीत स्त्री चा सिंहाचा वाटा असतो. समाजाला सबल आणि भावी पिढीला सक्षम बनविण्याची ताकद प्रत्येक स्त्री मध्ये असते. भविष्यातील आवाहने पेलण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी करावा. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण महत्वाची भूमिका बजावू शकतात असे आवाहन मान्यवरांनी उपस्थित महिलांना करत मार्गदर्शन केले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ.सौ. संगिता बाफना आणि मा.पल्लवी ताथेड यांनी करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर मा. राजेंद्र बाफना यांच्या आभार प्रदर्शनाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि नियोजन महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष आदरणीय अनिल नहार, मा. किशोर बाफना, मा.दिलीप टाटिया यांनी केले.