सर्वांप्रती शुभकामना शुभ भावना ही सदा सर्वदा असावी- ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी
सर्वांप्रती शुभकामना शुभ भावना ही सदा सर्वदा असावी- ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी
सर्वांप्रती शुभकामना शुभ भावना ही सदा सर्वदा असावी- ब्रह्माकुमारी वासंतीदिदीजी
ब्रह्माकुमारी मेरी सेवा केंद्राच्या प्रभू प्रासाद सभागृहात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा
नाशिक- फक्त दिवाळी पुरताच शुभेच्छा नाही तर आपल्या मनात सर्वांप्रती शुभकामना शुभ भावना ही सदा सर्वदा असावी. जे देणार तेच मिळेल हा सिद्धांत आपल्या जीवनात नेहमी लक्षात ठेवावा. आपण इतरांना जे देत जाऊ तेच आपल्याला मिळत जाईल, हेच यशस्वी होण्याचे मंत्र आहे. वैश्विक शुभ भावनेचा हा मंत्र सिध्द करून आपण सर्व यशाचे तारे बनून साऱ्या विश्वाला आलोकित करूया. असा शुभाशीर्वाद राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केले.
दिवाळी हा सण अंधारावर व प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. दिवाळीत सर्वत्र दीपोत्सव असतो. दीप हा आत्म जागृतीचे प्रतीक असून दीपराज निराकार शिव परमात्मा कडून सर्वांनी आपली आत्मज्योत जागृत करावी. आत्म जागृती व परमात्म परिचय साठी राजयोगा मेडिटेशन संस्थे द्वारे निःशुल्क शिकवला जातो. या राजयोग द्वारे जीवनात सुख शांती प्राप्त करावी असा दिवाळीचा संदेश दीदींनी याप्रसंगी प्रस्तुत केला. |
नाशिक - दि. १ नोव्हेंबर रोजी ब्रह्माकुमारी मेरी सेवा केंद्राच्या प्रभू प्रासाद सभागृहात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आशीर्वाचन व्यक्त करताना दीदीजी बोलत होत्या. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, जिल्हा मुख्याध्यापक संघ मार्गदर्शक एन.एन.खैरनार, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष विलास येवले, सुनील कोठावदे, रामतीर्थ.गोदावरी महाआरती अध्यक्ष जयंत गायधनी, ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र फड, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, दैनिक प्रहारचे उत्तर महाराष्ट्र आवृत्ती संपादक प्रतापराव जाधव, दैनिक साईमत जिल्हा प्रतिनिधी तुषार जाधव, साप्ताहिक आपला आवाज संपादक अमोल सोनवणे, आदी मान्यवर दीप प्रज्वलनासाठी उपस्थित होते.
म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्य कलापाविषयी जाणून घेतले व ब्रह्माकुमारी संस्थेत मी यापूर्वीच यायला हवे होते असेही नमूद करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. |