चांगले कर्म कसे करावे याचे पूर्ण प्रशिक्षण ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये मिळत असते - ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी
चांगले कर्म कसे करावे याचे पूर्ण प्रशिक्षण ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये मिळत असते - ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी
लकी ड्रॉ द्वारे प्रथम क्रमांक सुशीला आवारे यांना तर द्वितीय रूपाली सोनार, तृतीय क्रमांक कुबेर सवयी तर चौथा क्रमांक जयश्री क्षीरसागर यांनी मिळविला.
जेलरोड - आपल्या प्रत्येक कर्माचे अकाउंट बनत असते. श्रेष्ठ कर्माचे श्रेष्ठ अकाउंट तर व्यर्थकर्माचे व्यर्थ अकाऊंट बनत असते. आपल्याला श्रेष्ठ प्रारब्ध पाहिजे असल्यास आपण श्रेष्ठ कर्म करणे खूप गरजेचे आहे चांगले कर्म कसे करावे याचे पूर्ण प्रशिक्षण ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक कोर्स अवश्य करावा असे आवाहन ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी केले
साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे प्रकाशित प्रश्नमंजुषा क्रमांक 10 च्या सोडत प्रसंगी आयोजित कार्यक्रमात दीदी जी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक श्री अरुण पाटील, सुख वास्तू बिल्डकॉन चे संचालक सुरेंद्र मोहबिया,
किड्स टाउन प्ले स्कूलच्या संचालिका निशिगंधा साळवे, मोरया पार्क चे सिद्धांत शार्दुल, एम जे प्ले स्कूलचे नागपुरे सर, सिल्वर लाईन प्ले स्कूलच्या सावंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
वास्तू बिल्डकॉन चे संचालक सुरेंद्र मोहाबिया यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात . येथे येणारे कॉल्स हे मोजकेच असतात परंतु अतिशय कामाचे असतात. अनावश्यक कॉल येथे येत नाही. तसेच नाशिक परिसराची सर्विसही खूप चांगली असून सर्व वाटप यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने वाटप करीत असतात. ब्रह्माकुमारी संस्थेचा असलेला येथील सहभाग अतिशय चांगला आहे, संस्थेच्या जवळच आमचे राहण्याचे ठिकाण असल्यामुळे येथील साप्ताहिक कोर्स आम्ही लवकरच करू अशीही शाश्वती श्री सुरेंद्र यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे प्रथम द्वितीय व तृतीय असे तीन बक्षीस ठेवण्यात आले होते यापैकी पहिले बक्षीस चे प्रायोजक निर्मल पार्कचे सुरेंद्र मोहबिया हे होते तर चौथ्या बक्षिसाचे प्रायोजकत्व हरिओम सोप प्रोडक्टचे संचालक ओम सामवेदी यांनी स्वीकारले. तर पहिल्या तीनही विजेत्यांना शिवानी ऑप्टिकल्स तर्फे चष्म्याची एक प्रेम मोफत देण्यात येणार आहे.
लकी ड्रॉ द्वारे प्रथम क्रमांक सुशीला आवारे यांना तर द्वितीय रूपाली सोनार, तृतीय क्रमांक कुबेर सवयी तर चौथा क्रमांक जयश्री क्षीरसागर यांनी मिळविला.
विजेत्यांना आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कारित करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांच्या हस्ते करण्यात आला.
ब्रह्माकुमारी संस्था तर्फे खास विद्यार्थ्यांसाठी दिनांक पाच मे पासून उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या नि:शुल्क शिबिराचा सर्व पालकांनी आपल्या पाल्याला फायदा करून द्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी याप्रसंगी केले. परिसरातील नागरिकांसाठी सुद्धा ज्योती एम्पायर या ठिकाणी असलेल्या कम्युनिटी हॉलमध्ये साप्ताहिक कोर्स उपलब्ध करून देण्यात येईल असे अरुण पाटील यांनी पुष्टी दिली.
कार्यक्रमात कराओके सिंगर सुनीता सूर्यवंशी यांनी गीत प्रस्तुत करून आभार प्रगट केले. प्रास्ताविक साप्ताहिक नाशिक परिसर चे संपादक दिलीप बोरसे यांनी केले तर कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सचिन मोरे राजेश जाधव गणेश लोहार अशोक सूर्यवंशी पांडुरंग दाभाडे अमिन शेख प्राजक्ता मोरे आदी सदस्यांनी यशस्वी मेहनत केली