सामूहिक रामरक्षा पठण

ram lalla, shriram, jay shree ram

सामूहिक रामरक्षा पठण
सामूहिक रामरक्षा पठण
सामूहिक रामरक्षा पठण
सामूहिक रामरक्षा पठण

सामूहिक रामरक्षा पठण करून नासिक महिला गुजर समितीने 

आगळावेगळा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा  कार्यक्रम साजरा केला

नाशिक- (दि 18 जानेवारी) गुर्जर महिला समितीने सामूहिक रामरक्षा पठण करत आणि वाण म्हणून प्रसादाची वाटी देत एक आगळावेगळा संक्रांतीचा कार्यक्रम साजरा केला 

याप्रसंगी गुर्जर महिला समितीच्या अध्यक्ष सौ संगीता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नासिक गटविभाग संपर्कप्रमुख श्री महेश गोरवाडकर यांचे स्वागत केले.  उपाध्यक्ष डॉ. सौ. प्राजक्ता पाटील यांनी सर्व महिलांना सामूहिक रामरक्षा पठणाचे आवाहन करत सूत्रसंचालन केले. सर्व संचालिका मंडळ तसेच महिलांनी अगदी जल्लोषात कलशाचे पूजन केल्यानंतर समाजातर्फे श्री .विजय भाई आणि  विनय भाई यांनी येणाऱ्या 22 तारखेला  राम लल्लाच्या स्वागतासाठी घराघरात कौटुंबिक पूजा     करण्यास मार्गदर्शन केले .सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कु. जयस्वी मोहन चौधरी आणि कु.हमीशा पाटील यांनी नृत्य सादर केले. महिला समितीच्या माजी अध्यक्ष सौ अंजली पाटील यांच्याकडून  महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देण्यात आले. चाईल्ड डेव्हलपमेंट वर सौ. प्रियंका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुर्जर महिला मंडळाने यशस्वी नियोजन केले.