अध्यात्मिक प्रदर्शन व द्वादश ज्योति्लिंग देखावा लाखो भक्तांसाठी भक्तीपीठ ठरेल - ना. दादा भुसे

अध्यात्मिक प्रदर्शन व द्वादश ज्योति्लिंग देखावा लाखो भक्तांसाठी भक्तीपीठ ठरेल - ना. दादा भुसे

नाशिक- पाथर्डी  येथे दिनांक 21 ते 25 नोव्हेबर पर्यंत पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान ब्रह्माकुमारी सेवा केंद्र तर्फे या परिसरात येथे येणाऱ्या भाविकांसाठी द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन आध्यात्मिक मेळा व चित्र प्रदर्शनींचे आयोजन ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. 

या मेळ्याचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री व शिवपुरान कथा   स्वागताध्यक्ष नामदार दादा भुसे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून आयोजन समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते उपस्थित होते. समिती सदस्य प्रवीण तिदमे, नगर सेवक सुदाम कोंबडे,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय सांगळे आदी मान्यवर कार्यक्रमांत उपस्थित होते.

जगभरात प्रसिद्ध भारतभर विविध ठिकाणचे  12 ज्योति्लिंगाचे दर्शन एकाच छताखाली भाविकांना उपलब्ध होत असून येथील अध्यात्मिक चित्र प्रदर्शन च्या माध्यमातून भाविकांना भगवंताचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. ब्रह्माकुमारी संस्थेला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल दीदींनी आयोजकांचे आभार व्यक्त केले व या आयोजनातून समाजात नक्कीच आध्यात्मिक जनजागृती होईल व समाजात सुख शांती प्रस्थापित होईल असे मत व्यक्त केले. या अध्यात्मिक मेळ्याचा सर्वभाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असेही आवाहन दिदीजी यांनी या प्रसंगी केले.

नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री तथा श्री शिव पुराण कथा आयोजनाचे स्वागताध्यक्ष नामदार दादा भुसे यांनी ब्रह्मकुमारी द्वारा आयोजित बारा ज्योतिर्लिंग व नव विश्व निर्माण अध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचे उद्घाटनपर बोलताना देशभरातील  बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने शिवभक्त विविध राज्यांमध्ये जात असतात. मात्र ब्रह्माकुमारी संस्थेच्यावतीने  ईश्वरीय संदेश देण्यासाठी  बारा ज्योतिर्लिंग प्रतिकृती व चित्र प्रदर्शनचे आयोजन येथे सुंदररित्या केले आहे. या प्रदर्शनातून  सर्व मानवी आत्म्यांना सुख शांती, आनंद चा मार्ग नक्कीच प्राप्त होईल. हे अध्यात्मिक प्रदर्शन  लाखो भक्तांसाठी भक्तीपीठ ठरेल.  मोठ्या संख्येने सर्व भाविकांनी ह्या अध्यात्मिक  प्रदर्शन व द्वादश ज्योतिर्लिंग देखव्याचा अवश्य लाभ घ्यावा. असे उद्गार ना. दादा भुसे यांनी काढले.

शिवसेना (शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष तथा आयोजन समिती अध्यक्ष अजय बोरस्ते बोलताना म्हणाले की, आज सर्वांगीण विकास व  मन:शांतीसाठी अध्यात्म व ध्यान धारणेची नितांत गरज आहे. अध्यात्म  व ध्यानधारणा हे माणसाच्या आंतरिक जीवनाशी निगडीत आहे आणि त्याची सुरुवात आंतरिक प्रवासापासून होते. त्या सर्व क्रिया  माणसाला पवित्र, निर्मळ बनवत त्या माणसाला आनंददायी करतात. पूर्णतेची अनुभूती देत असतात.  हे सर्व पवित्र कार्य ब्रह्माकुमारी वासंती दीदी व त्यांचा व संपूर्ण परिवार अथकपणे करत आहेत. ब्रह्माकुमारीच्या मेडिटेशनद्वारे तणाव मुक्ती होऊन सकारात्मक विचार निर्माण होतात,  याची सर्वत्र  अनुभूती येतांना दिसते, असे उद्गार कथा आयोजन समिती अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी काढले.

कार्यक्रमात उद्घाटन पूर्वीपासूनच भाविकांनी या चित्र प्रदर्शनाचे अवलोकन करून आपली अध्यात्मिक उन्नती साधली. याप्रसंगी शिव भोलेनाथचा 51फुटी त्रिशूल व 12 फुटी शिवलिंग आकर्षणाचे केंद्र होते. या कार्यक्रमात सहा लाख भाविकानी शिवपुराण कथेचा लाभ घेतला असून लाखो भाविकांनी द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन अध्यात्मिक मेळा चा लाभ घेतला. अध्यात्मिक चित्रप्रदर्शन अनेक भाविकांनी परमात्मा अवतरणाचे रहस्य जाणून घेतले

 कार्यक्रमाचे सफल आयोजन ब्रह्माकुमारी संस्थेच्या साधकांनी केले. बी के विणादिदी,  बी के पुनम दिदी, बी के गोदावरी, बी के शक्ती दिदी, बी के विणू दिदी, बी के ज्योती दिदी, बी के मंगल दिदी, बी के कावेरी दिदी आदी समर्पित भगिनी उपस्थित होत्या.

चौकट

या अध्यात्मिक मेळ्यामध्ये ध्यान कक्षाची सुद्धा निर्मिती करण्यात आले आहे. ज्यामध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांना ब्रह्माकुमारी भगिनींनतर्फे मेडिटेशन करविण्यात आले. दिवसभराच्या दगदगीनंतर ध्यान कक्षात बसल्यावर उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. दिवसभरात हजारो शिवभक्तांनी शिवबाबाच्या मेडिटेशन रूम मध्ये मेडिटेशनची सुंदररित्या अनुभूती घेतली.