व्हॉइस ऑफ मीडियाचे उद्या उत्तर महाराष्ट्र अधिवेशन, अशोक भाऊ वानखेडे यांची उपस्थिती

व्हॉइस ऑफ मीडियाचे उद्या उत्तर महाराष्ट्र अधिवेशन, अशोक भाऊ वानखेडे यांची उपस्थिती

पाचशेहून अधिक पत्रकारांचा सहभाग, विविध प्रश्नांवर मंथन, 10 जेष्ठ पत्रकार, गुणवंत पाल्यांचा सन्मान 

नाशिक प्रतिनिधी 

पत्रकारांनी पत्रकरासाठीच चालविलेली , 41देशात लाखों सदस्य संख्या असलेली व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अधिवेशन येत्या शनिवार दि.25 मे रोजी नाशिक मध्ये होत आहे.स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ,गरुड झेप अकॅडमी गंगापूर धरण नजिक येथे संपन्न होणाऱ्या या अधिवेशनासाठी  उपस्थित पाचशेहून अधिक पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक भाऊ वानखेडे हे उपस्थित राहणार असून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.

या अधिवेशनासाठी  पाचशेहून अधिक पत्रकारांनी नोंदणी केली आहे.प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के ,प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ आणि उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनात या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून दोन सत्रात होणाऱ्या या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्वपूर्ण ठराव मांडले जाणार आहेत.तसेच व्हॉईस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र अधिवेशनाच्या स्मृती जतन करणारी स्मरणिकाही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली जाणार आहे.याशिवाय जिल्ह्यातील दहा जेष्ठ पत्रकार यांनाही सन्मानित करण्यात येणार असून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली.या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात विशेष निमंत्रित म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सार्व. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, यांच्यासह दीपक चंदे, जयेश ठक्कर, नेमीचंद पोद्दार आदींची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.श्रीकांत सोनवणे , जिल्हाध्यक्ष कुमार कडलग,कार्याध्यक्ष धर्मेंद्र मुल्हेरकर,दिलीप साळुंके,उपाध्यक्ष सुधीर उमराळकर,ब्रीज परिहार, सरचिटणीस देवानंद बैरागी,मायकल खरात,प्रवक्ता प्रमोद दंडगव्हाळ,विठ्ठल भाडमुखे ,....,.,....आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेविषयी माहिती: 

कौतुक नको, योगदान हवे

तब्बल 41 देशात आणि देश राज्य पातळीवर सर्वाधिक सदस्य असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे सदस्य होण्याची सर्व माध्यम वर्गातील प्रतिनिधीना सुवर्ण संधी उपलब्ध आहे.

संघटनेची पंचसूत्री: 

1)प्रत्येक बेघर पत्रकाराला हक्काचे घर, प्रत्येक जिल्ह्यात 100 घरे उपलब्ध करून देणे.. महाराष्ट्रात सद्य स्थितीत सात जिल्ह्यात प्रकल्प सुरु आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नाशिक जिल्ह्यात प्रकल्प सुरु होईल.

2) पत्रकार पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य 

3) पत्रकार आणि कुटुंबासाठी आरोग्य सुविधा, प्रसंगी क्लिष्ट, दुर्धर आजारात आर्थिक सहाय्य 

4)पत्रकारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि अर्थ सहाय्य उभे करण्यासाठी सहकार्य 

5) निवृत्ती वेतन, अधिस्वीकृतीचा लाभ जास्तीत जास्त पत्रकारांना सहज मिळेल अशी सुलभ प्रक्रिया राबविण्यास शासनावर दबाव आणणे,जिल्हा पातळीवर पत्रकारांची शासनदरबारी कायमस्वरूपी नोंद होईल याविषयी प्रयत्न करणे 

....... संघटनेने नागपूर येथे केलेल्या उपोषण आंदोलनामुळे पत्रकारांना जाहीर झालेली 11000/- पेन्शन सरकारला 20000/- करणे भाग पडले..

संघटनेचे हे मोठे यश आहे. याशिवाय नव्या युगासोबत वाटचाल करण्यासाठी पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत करून साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करने...