अध्यात्मिक ज्ञान व राजयोग च्या माध्यमातून रावणाचे दहन केल्यास विश्वाचे परिवर्तन निश्चितच होणार- राज योगिनी संतोष दादिजी

Bks news

अध्यात्मिक ज्ञान व राजयोग च्या माध्यमातून रावणाचे दहन केल्यास विश्वाचे परिवर्तन निश्चितच होणार- राज योगिनी संतोष दादिजी
ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी व खासदार भास्कर भगरे सर

अध्यात्मिक ज्ञान व राजयोग च्या माध्यमातून रावणाचे दहन केल्यास विश्वाचे परिव

र्तन निश्चितच होणार- राज योगिनी संतोष दादिजी

*नाशिक- (दि. 12)* दसऱ्याच्या शुभ दिनी शुभ संकल्प करा की स्वपरिवर्तनाने आपल्यातील विकार रुपी रावणाचे दहन करून विश्व परिवर्तन होईल. रावण काही स्थूल अग्नीने मरणार नाही तर आपल्यातील विकारांना भस्मिभूत करून अध्यात्मिक ज्ञान व राजयोग च्या माध्यमातून रावणाचे दहन केल्यास विश्वाचे परिवर्तन निश्चितच होणार आहे. व्यर्थ चिंता सोडून द्या आध्यात्मिक ज्ञानाचे चिंतन करा असे प्रतिपादन माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादीजी यांनी केले.

 दि. 12 ऑक्टोबर रोजी द्वारका टाकळी रोड येथील सिंगापूर गार्डन अवंतिका सोसायटी येथे ब्रह्माकुमारी संस्थेचे नवनिर्मित राजयोग ध्यान साधना सभागृह डिवाइन टच या सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरेसर, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे , मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीन भाऊ ठाकरे, नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, नगरसेविका अर्चना थोरात, मालेगाव चे एस पी गजानन राजमाने, चार्टर्ड अकाउंटंट सतीश कासलीवाल, माय लाईफस्टाईलचे डॉक्टर योगेश निकम, डॉक्टर मयुरी बच्छाव, वैमानिक शौर्य कोहक , माउंट आबू येथून विशेष अतिथी म्हणून ब्रह्माकुमार जितूभाई व ब्रह्माकुमार नितीन भाई, दैनिक लोकनामा निवासी संपादक चंद्रशेखर शिंपी, उपसंपादक धनंजय बोडके, साप्ताहिक आपला आवाज चे संपादक अमोल सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या वक्तव्यात खासदार भास्कर भगरे सर यांनी सांगितले की डिवाइंडच या नावाने उभारलेली ही वास्तू अतिशय अप्रतिम असून या ठिकाणी सृष्टीचक्राचे ज्ञान दिले जाते आत्मा परमात्म्याचा अध्यात्मिक संबंध जोडला जातो यातून नक्कीच साधकांना सुख शांतीची प्राप्ती होते. आज प्रत्येकाच्या जीवनात सुख शांतीची व ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या मूल्य शिक्षणाची खूप आवश्यकता असून ब्रह्माकुमारी संस्था करीत असलेले कार्य हे अध्यात्मिक सुख शांती प्रदान करणारे आहे. डिवाइंड टच या नवनिर्मित वास्तूतून या सुख शांतीचा प्रचार प्रसार सर्व दूर व्हावा अशा शुभेच्छा भगरे सर यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

आमदार देवयानी फरांदे यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त करत

ब्रह्माकुमारी संस्था करीत असलेल्या आध्यात्मिक कार्याचा गुणगौरव केला. समाजातील व्यक्ती घडवणं त्याच्यात आध्यात्मिक जनजागृती करणे असे कार्य ब्रह्मकुमारी संस्था करीत आहे. डिवाइंड टच या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून हे कार्य अधिक जोमाने घडो अशा शुभेच्छा आमदार फरांदे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या..

मराठा विद्या प्रसारक संस्थेतील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये ब्रह्माकुमारी संस्थेचे अध्यात्मिक मूल्य शिक्षणाचे वर्ग घेण्यात येतात मूल्य जागृतीचे ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य अतुल्य आहे असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे यांनी केले.

बोहरी समाजाचे अजगर अली फखरुद्दीन चोपड़ा वाला यांनी ब्रम्हाकुमारी संतोष दीदी जी यांचा समाजातर्फे सत्कार केला.

ब्रह्माकुमार ओंकार यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे मन जिंकली. ब्रह्माकुमारी भारती यांनी संतोषी मा च्या आरती वर नृत्य प्रस्तुत केले. डी फॉर डान्स अकॅडमी चे संजय व टीम ने आकर्षक पदन्यास केला. कुमारी दक्षता हिने स्वागत नृत्य प्रस्तुत केले. ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी आपल्या वक्तव्यात द्वारका परिसरात द्वारका सेवा केंद्राची मुहूर्तमेढ कशी झाली याचा संस्मरणीय प्रवास प्रस्तुत केला.

सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी तर स्वागत ब्रह्मकुमारी ज्योती दीदी यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर मल्हार देशपांडे यांनी मानले. औरंगाबादच्या शिलादीदी, मालेगावच्या शकुंतला दीदी, ममता दीदी बराहणपुरच्या मंगला दिदी, उल्हासनगरच्या सोम दिदी, पुष्पा दीदी, सरला दिदी, शक्ती दीदी गोदावरी दीदी मनीषा दीदी आरती दीदी, मीरा दीदी राणी दीदी, पुष्पा दीदी, आदी समर्पित भगिनी उपस्थित होत्या.