राणे नगर सेवा केंद्राचा 25वां वर्धापन दिन उत्साहात संपन्न
News
राणे नगर सेवा केंद्राचा 25वां वर्धापन दिन उत्साहात संपन्न
राणेनगर - जेव्हा तुम्हा सर्वाँना प्रसन्न बघते तेव्हा मी पण प्रसन्न होऊन जाते. तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. आज 3.5 मुहूर्त पैकी एक धन त्रयोदशी खूप महत्वाचl सण आहे. याच दिवशी शिवालय या राणेनगर येथील सेवा केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे या स्थानाला नैसर्गिक रीत्या आशीर्वाद आहेतच, म्हणूनच या ठिकाणी पटकन वृद्धी होऊन या सेवा केंद्राचे आज विशाल स्वरूप तयार झाले आहे. येथे जागेची अडचण कधीच भासणार नाही. मला अभिमान आहे की नाशिक चे सर्व सदस्य मिळून मिसळून सेवा करत आहेत. नम्रतेने व गुणग्राहकतेने सेवा करीत रहा. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.
येथील राणेनगर स्थित शिवालय सेवा केंद्राचा 25 वा वर्धापन दिन (सिल्व्हर जुबली) रजत जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून दीदीजी बोलत होत्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बीके शक्ती दिदी बी के पुष्पा दीदी बिके मनीषा दीदी बीके ज्योती दीदी आदी समर्पित भगिनी उपस्थित होत्या.
आपल्या स्वागत संबोधनात संचलिका विणा दीदी यांनी सांगितले की शिवालय या सेवा केंद्राची खरेदी ई.स. 2000 मध्ये खरेदी करण्यात आली. यापूर्वी मात्र संस्थेचे नियमित साधक मुग्धा तांबे यांच्याकडे ईश्वरीय क्लास घेत. कालांतराने याच परिसरात एक फ्लॅट बघून तो विकत घेण्यात आला. पुढे या स्थानावरच अनेकांना ईश्वरीय ज्ञान सेवा केल्यामुळे वृध्दी होत गेली. विशेष म्हणजे मनोहर भाई व मुग्धा माता ह्या दाम्पत्याचा आदर्श घेऊन अनेक दांपत्य या ईश्वरीय कार्यामध्ये येऊ लागले. सर्वांच्या अथक परिश्रमातून कार्य सिद्धीस गेले. अल्पावधीतच सेवा केंद्रात साधकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यादरम्यान सेवा केंद्रा तर्फे परिसरात आठ ठिकाणी पाठशाळा सुरू करण्यात आली. याचा लाभ हजारो लोकांनी घेतला. हा ईश्वरीय ज्ञानयज्ञ अखंड चालूच असून नुकतेच सुचिता नगर येथे संस्थेची तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. परिसरातील लोकांच्या मागणी नुसार अजूनही इतर ठिकाणी मेडिटेशन वर्ग सुरू करण्यात येतील असा मानस ब्रह्माकुमारी विणादिदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यात प्रमुख अतिथी सोबत ब्रह्माकुमारीज पाठशाळा संचालकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होत. कु. समीक्षा कु परी यांनी नृत्य द्वारे स्वागत केले. नृत्य विषारद कु. वैष्णवी हिने ओम शंभो गीतावर कथक नृत्य सादर केले
सुभाष भाई मुग्धा माता व मनोहर भाई यांचा विशेष सेवे बद्दल सत्कार करण्यात आला.
ब्रह्माकुमारी मनीषा दीदी यांनी सांगितले- 2003 मध्ये मला सुद्धा या सेवाकेंद्रात सेवेची संधी मिळाली. शिव बाबा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सेवेंची संधी देतात. नाशिक मधील सर्व भगिणी व साधक हे परिश्रम घेणारे आहेत.सर्व साधकांचे येथे तन मन धन लागलेले आहेत. आज वर्धापन दिन तसेच धन त्रयोदशी निमित्त ब्रह्माबाबा सम सर्वाँना हेल्थ वेल्थ हॅपिनेस मिळत राहो याच शुभेच्छा….
ब्रह्माकुमारी पुष्पा दीदींनी सांगितले की आज लहान पणाच्या गोष्टी आठवत आहेत. सेवा केंद्र सुरुवातीच्या काळात असताना येथे नूतनीकरण चे कार्य चालू होते. त्याप्रसंगी मला येथे सेवा करण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळेस सेंटर अतिशय छोटे होते. किचनही छोटे होते व मी सुद्धा छोटीच होती. तरी मला एवढी मोठी सेवा करण्याची भाग्य लाभले.
ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी सांगितले की, या सेवा केंद्राच्या सेवेत मी तीन-चार महिने राहिले. ब्रह्माकुमारी विणादीदी यांच्यासोबत सेवा देताना खूप अनुभव आले. विणा दिदी यांच्या सेवेचा तडाखा इतका अफाट होता की त्यांना 24 तासही अपूर्ण पडत असे. प्रसंगी जेवण सोडून ही त्या सेवेसाठी तत्पर राहत असे. संस्थेचे साकार संस्थापक ब्रह्माबाबा सुद्धा 92 वर्षाच्या वयात खूप अथक सेवा करत. असेच आपणही अथक सेवाधारी व्हावे अशी इच्छा ज्योती दीदी यांनी व्यक्त केली.
ब्रह्माकुमारी शक्ती दीदी - आज च्या धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक लोक नवीन वस्तू घेतात आपणही शिवबाबा कडून अनेक अनेक दिव्य गुण व शक्तींनी संपन्न होऊ, आपण विश्व कल्याणकारी बनू…असा संदेश शक्ती दीदी यांनी दिला.
राणे नगर येथील समर्पित भगिनी चंदादीदी यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पुन्हा पुन्हा सेंटरला येत जावे असे आग्रहाचे निमंत्रण दिले.कार्यक्रमाचे शेरो शायरी युक्त सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी उज्ज्वला दीदी यांनी केलेया. प्रसंगी प्रिया बहेन, रविना बेहेन, मेघा बहेन. कावेरी बहन इत्यादि समर्पित भगिनींनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना ईश्वरीय भेट वास्तू देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राणेनगर सेवा केंद्राच्या साधकांनी अथक सेवा दिली.