पंचवटी सेवा केंद्राचा 51 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पंचवटी सेवा केंद्राचा 51 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पंचवटी सेवा केंद्र हे या सेवेचे मूळ स्थान- ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी

पंचवटी सेवा केंद्राचा 51 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

पंचवटी - ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक मधील सेवेची सुरुवात पंचवटी येथील पहिल्या सेवा केंद्रातून सुरू झाली. 1973 साली लावलेले ब्रह्माकुमारी संस्थेच्या सेवेचे हे रोपटे आज वटवृक्ष प्रमाणे बहरले आहे. आज 51 वर्ष झाल्यानंतर ब्रह्माकुमारी संस्थेचे नाशिक शहरात 40 पेक्षा जास्त सेवा स्थान निर्माण झालेले आहेत. पंचवटी सेवा केंद्र हे या सेवेचे मूळ स्थान आहे. येथूनच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सेवा पसरलेली आहे. असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी केले. 

     येथील सेवाकुंज ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात दि. 26ऑक्टोंबर रोजी दीपावली उत्सव व पंचवटी सेवा केंद्राचा 51 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. उद्घाटन दिप प्रज्वलित करून करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून दिंडोरी येथील नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे, पारख क्लासेसचे लोकेश पारख आदी मान्यवर उपस्थित होते. 

सेवाकेंद्राला 51 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल वरिष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यात ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी, ब्रह्माकुमार कृष्णा भाई, बी के सुरेश साळुंके सर, ब्रह्माकुमारी वीणा दीदी, ब्रह्माकुमारी विणु दीदी, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांचा ताज व शेला अर्पण करून सत्कार करण्यात आला. 

आपल्या वक्तव्यात ब्रह्माकुमारी विना दीदी यांनी पंचवटी सेवा केंद्रातील सुरुवातीच्या काळातील आपले अनुभव कथन केले. विना दीदींनी सांगितले की पूर्व प्रशासिका गीता दीदी ह्या नियमांचे अतिशय कठोर होत्या त्यांना कुठल्याही प्रकारे ढिलाई चालत नसे. लॉ आणि ऑर्डर प्रमाणे चालणे  त्यांचा स्वभाव गुणधर्म होता मात्र त्यानंतर आलेल्या वासंती दीदी जी ह्या मृदू स्वभावाच्या व अतिशय प्रेमळ आहेत. त्यांच्यामध्ये लव म्हणजेच सहृदय व प्रेम भरपूर भरलेले आहे त्यांच्या प्रेमपूर्वक वागण्याने व पूर्व प्रशासिका गीता दीदी यांच्या नियमांच्या कठोर वागणुकीतून आम्हाला लव आणि लॉ चा बॅलन्स लाभला आहे. 

ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी सांगितले की आमचे ज्यावेळेस समर्पणही झाले नव्हते त्या काळापासून आम्ही पंचवटी सेवा केंद्रात सेवा देत होतो. त्यावेळेस गीता दीदींनी आम्हाला जे शिकवले ते आजही आमच्यासाठी पथक दर्शक आहे. पंचवटी सेवा केंद्र हे आमचे जन्मस्थान आहे येथूनच आमचे समर्पण मधुबन मध्ये झाले.

ब्रह्माकुमारी विनू दीदी ह्या 1991 मध्ये पंचवटी सेवा केंद्राशी जुळल्या गेल्या. त्यांच्या पंचवटी सेवा केंद्रात अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत असे ब्रह्माकुमारी विनोदी यांनी नमूद केले. 

ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी सांगितले की पंचवटी येथील सेवा केंद्रातूनच द्वारका सेंटर ला सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले पंचवटी सेवा केंद्रात आल्यावर जुन्या आठवणी जागृत होतात… 

ब्रह्माकुमार कृष्णा भाई यांनी पंचवटी सेवा केंद्राचा १९७३ पासून चा इतिहास सांगितला सुरुवातीला. धुळे येथील ब्रह्माकुमारी रिटा दीदी यांनी सेवेची मुहूर्त मेढ केली. अतिशय छोट्या स्वरूपात नाशिक मधील विविध ठिकाणी आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी लावून सेवा सुरू करण्यात आली. या सेवेतून अनेक साधकांना अध्यात्मिक मार्ग सापडला व यातूनच पुढे पंचवटी सेवा केंद्राची निर्मिती झाली असे कृष्णाभाई यांनी नमूद केले. 

पंचवटी सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांनी उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे अनोखे नियोजन करून प्रमुख भगिनींना सत्कारितही केले.  आभार प्रदर्शन ब्रह्माकुमार डॉ. पवन हींगणे यांनी केले, ब्रह्माकुमार ओंकार यांनी दिवाळी सणाचे गीत गाऊन सर्वांना उत्साहित केले. कु. तनया हिने स्वागत नृत्य केले. कार्यक्रमात बीके उज्वला बीके कावेरी बीके सहित अनेक समर्पित भगिनी पंचवटी व नाशिक मधील वरिष्ठ राजयोगी साधक व नियमित येणारे साधक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना आदरणीय वासंती दीदीजी यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमात सर्वांनी पंचवटी सेवा केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.