दिव्यांग क्रिकेट पटू आमीर हुसेन लोन

दिव्यांग क्रिकेट पटू आमीर हुसेन लोन

दिव्यांग क्रिकेट पटू आमीर हुसेन लोन

जम्मू आणि कश्मीर

आमीर हुसेन लोन हा जम्मू आणि कश्मीरमधील बिजबेहारा येथील वाघमा गावातील एक आगळा वेगळा दिव्यांग तरुण आहे. तो एक प्रेरणादायी क्रिकेटपटू आहे, जो दोन्ही हात नसलेला क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. आमीर सध्या जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. वयाच्या ८ व्या वर्षी एका अपघातामुळे  आमीरचे दोन्ही हात त्याला गमवावे लागले. पण हा धक्का बसला तरीही आमिरने पायांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तो त्याच्या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण शैलीसाठी पटकन ओळखला जाऊ लागला. आमीर हुसेन लोन,  बॅट त्याच्या मान आणि हनुवटीमध्ये ठेवून बॅटिंग करू शकतो आणि पायांनी गोलंदाजी करू शकतो. तो खरोखरच एक जबरदस्त लढवय्या आहे आणि प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे.

एका शिक्षकाने आमीर हुसेन लोन याची क्रिकेटची प्रतिभा शोधून काढली आणि त्याला पॅरा क्रिकेटची ओळख करून दिली. तेंव्हापासून म्हणजे  2013 पासून तो व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. 2013 मध्ये, त्याचा संघ दिल्लीत केरळ क्रिकेट संघाविरुद्ध खेळला, जिथे त्याने त्याच्या कामगिरीने  आपल्या नावाची जणू हवा निर्माण केली. 2024 मध्ये, आमीर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) मध्ये खेळला. त्या सामन्यात सचिनने त्याच्या नावाची आमीरची जर्सी (क्रमांक 1) घातली होती आणि आमिरने सचिनच्या नावाची जर्सी (क्रमांक 10) घातली होती.

डायनॅमिक आणि अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात कुशल सहकार्‍यां समवेत मध्ये काम करणे आणि एक्सपोजर आणि अनुभव मिळवणे हे आमीरचे जीवनातील ध्येय आहे. कुठल्याही संघासाठी तो एक मौल्यवान ठेवा असेल.