झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा कार्यान्वित

झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा कार्यान्वित
झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा कार्यान्वित
झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा कार्यान्वित
झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा कार्यान्वित


झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था पुन्हा कार्यान्वित

भव्य समारंभातून पतसंस्थेच्या कार्याला उजळणी

संस्था 100 कोटी चे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करेल - रतन चावला

नाशिक रोड- का. प्र. (दि. ९ एप्रिल) येथील झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचा पुनश्च आरंभ सोहळा दिनांक 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा व सिंधी नववर्ष चेट्रीचंड च्या निमित्ताने करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून उपनिबंधक संदीप जाधव साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून राजयोगिनी ब्रह्माकुमारी शक्ती दिदी उपस्थित होत्या. ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे बी के  बी के  विजया माता व सुनीता टवरी  यांनी मनोगत व्यक्त केले. 

 झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष रतन चावला यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या संबोधनात रतन चावला यांनी पतसंस्था पुनर्जागृती करण्याच्या दृष्टीने संस्थेचे ध्येय धोरण स्पष्ट केले.  मागच्या संचालकांनी केलेल्या चुकांना दुरुस्त करून पुन्हा संस्था 100 कोटी चे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करेल असा मानस चावला यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट गाढण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातील याचा आराखडा त्यांनी यावेळी स्पष्ट केला.

उद्घाटक म्हणून उपस्थित उपनिबंधक संदीप जाधव सर यांनी कोणतीही संस्था बायलॉज व नियमांप्रमाणे चालल्यास कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही.  अशा नियमांना धरून जर संस्था कार्यरत असेल तर निबंधक कार्यालयाकडूनही कुठल्याही प्रकारचा दबाव संस्थेवर नसतो.  संस्थेने आपले कार्य सूचारू पद्धतीने चालवल्यास नागरिकांचा सुद्धा फायदा होतो व सभासदांना सुद्धा लाभांश वेळेवर मिळत असतो त्यामुळे कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप न करता योग्य निकषानेच कार्यभार चालवावा या कार्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडून आपणास संपूर्ण सहकार्य असेल असे प्रतिपादन जाधव यांनी याप्रसंगी केले. 

ऋतिक कलानी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. गुरुमुख जगवानी यांनी आपल्या मनोगतात पतसंस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या सहयोगाची अपेक्षा असून सर्वांच्या आशीर्वादाने आपण पुन्हा संस्थेला गत व वैभव प्राप्त करून देऊ असे सांगितले.

या छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष हरीश देवानी डॉक्टर,  कांचन लोकांणी,   हेमंत विजराणी किशोर कार्डा,  चंद्रकांत वेंसीयाणी, गोपाल सचदेव भगवान मोटवानी, हेमंत पदमानी, कन्हैयालाल मखिजा,  प्रकाश कालवाणी आदी संचालक उपस्थित होते. 

कार्यक्रमात सिंधी बहरणा पूजा  व श्री सत्यनारायणाची पूजा ठेवून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी शुभकामना व्यक्त केल्या. पत संस्थेच्या वृद्धीसाठी सर्व स्तरातून खातेदारानी आपले चालू व बचत खाते कार्यान्वित करावे असे आवाहन संचालकांनी याप्रसंगी केले.