संकटमोचन कॉलनीत हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य भंडारा

मंदिराची स्थापना 17 वर्षांपूर्वी चाचा अंगणचे चाचा गुप्ता परिसरातील ज्येष्ठ नागरिक व तरुण तडफदार व्यक्तिमत्व जयेश आमले यांच्या प्रयत्नातून झाली.

नाशिक - टागोर नगर येथील संकट मोचन कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मित्र मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य भंडारा दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी मोठ्या भक्ती भावाने पार पडला. या कार्यक्रमात जवळपास 2000 पेक्षा अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांसाठी आयोजकांतर्फे भात बुंदी व मिक्स भाजी वटाणा बटाटा तसेच कोशिंबीर चे स्वादिष्ट मेनू देण्यात आला.

संकट मोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिराची स्थापना 17 वर्षांपूर्वी चाचा अंगणचे चाचा गुप्ता परिसरातील ज्येष्ठ नागरिक व तरुण तडफदार व्यक्तिमत्व जयेश आमले यांच्या प्रयत्नातून झाली. मागच्याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्याचा संकल्प करण्यात आला असून लवकरच सर्व अडचणींवर मात करून हे भव्य मंदिर या ठिकाणी निर्माण होणार आहे. या मंदिराच्या सर्व देखरेखी व आयोजनामध्ये अनेक तरुणांनी आपला मोलाचा तन-मन-धन समर्पित केले आहे. यात विशेष म्हणजे सुभाष गांगुर्डे प्रसाद नवले शशी गोसावी गणेश लोंढे सचिन सोनार शुभम मोरे ललित बागुल शेखर मोरे नंदू मोरे भावेश मोरे सुमित चौधरी उमेश चौधरी बाळा  वहाडणे  ऋषी जाधव सोनू गांगुर्डे स्वराज टिळे इत्यादी मंडळातील सदस्यांचा सहभाग जाणवला. या भंडारा कार्यक्रम साठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक मागच्याही वर्षापेक्षा अधिक उत्साहाने उपस्थित होते.