ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन

ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन
ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन
ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन
ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन
ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन

ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे व्यसनराज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन

नाशिक  - येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या राणेनगर सेवा केंद्र तर्फे ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांच्या मार्गदर्शनाने व्यसन राज नाटिकेद्वारे समाज प्रबोधन करण्यात आले. बीडी सिगारेट तंबाखू दारू, ड्रग्स इत्यादी अनेक प्रकारचे व्यसन हे समाजाला लागलेली कीड असून पिढीच्या पिढी यातून बरबाद होतात. या व्यसनांना हद्दपार करण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्था राजयोग मेडिटेशन द्वारे व्यसनांवर विजय मिळवण्याचा राजमार्ग दाखवत आहेत असे या नाटीकेमधून दाखविण्यात आले.  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांच्या मंचावर दाखविलेल्या या नाटिकेतून समाज प्रबोधनाचे खूप चांगले माध्यम उपलब्ध झाले असून अनेक गणेश मंडळांनी स्वतःहून पुढे येऊन या नाटीकीचे सादरीकरण आपल्या मंडळातर्फे केले.  यात विशेषतः दिनांक 10 सप्टेंबर रोजी इंदिरानगर येथील मा. नगरसेवक श्याम बडोदे यांच्या श्री प्रतिष्ठान मित्र मंडळातर्फे,  दिनांक 11 नोव्हेंबर रोजी अक्षय खंडारे यांच्या मित्र मंडळातर्फे,  दिनांक 12 सप्टेंबर रोजी दत्तधाम चौक सिडको येथील अमोल नाईक यांच्या मित्र मंडळातर्फे,अध्यक्षतेखालील  दिनांक 13 सप्टेंबर रोजी बि.डी. भालेकर मैदान मायको कंपनी व  महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गणेश देखाव्यासमोर,  दिनांक 14 सप्टेंबर रोजी कामगार नगर सातपूर येथील एडवोकेट जाधव यांच्या  मित्र मंडळात व त्याच दिवशी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान सावता नगर मधील मा. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या मित्रमंडळात,  दिनांक 15 सप्टेंबर रोजी भाभा नगर येथे आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री 8:30 या दरम्यान व रात्री 9.30 ते पावणे दहा च्या दरम्यान राणेनगर येथील मां. नगरसेवक बापू सोनवणे यांच्या मित्र मंडळात त्या दिवशी रात्री 10 ते 10.30 पाथर्डी फाटा येथील गमने मळा येथे तर दिनांक 16 रोजी नवी मुंबई नाका आमदार वसंत गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत 8.30 ते 9.30  यादरम्यान तर साडेनऊ ते दहा दरम्यान विशाल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव स्टॅन्ड येथे या नाटिकेचे प्रदर्शन करण्यात आले. 

या नाटिकेचे उत्कृष्ट नियोजन बीके हिरालाल मथुरे यांनी केले तर ब्रह्माकुमारीच्या अभिनयात ब्रह्माकुमारी उज्वला दीदी व कावेरी दिदी होत्या. व्यसन राजच्या भूमिकेत बीके  दत्ता चांडोले,  तंबाखूच्या भूमिकेत बीके राहुल बच्छाव, भगवान पाटील सुनील श्रावगी, पान मसाल्याच्या भूमिकेत बीके मधुकर मराठे, दारूच्या भूमिकेत बीके अमोल पाटील  , ड्रग्सच्या भूमिकेत बीके विलास सूर्यवंशी व वैभव नकाते, सिगारेटच्या भूमिकेत व्यक्त सोमनाथ खोडे  व निलेश जाधव इत्यादींनी आपला अभिनय सादर करून प्रेक्षकांमध्ये वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे चित्रीकरण ब्रह्मकुमार महेंद्र बच्छाव यांनी उत्कृष्टपणे करत बीके लहू नाना सोनार, बीके गोविंद गगणभिडे, बिके यशवंत धरम, आशा माता पवार, अक्षरमाता गगणभिडे  इत्यादींनी कार्यक्रमासाठी सहाय्य केले. 

कार्यक्रमात मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी व्यसन त्यागण्याची प्रतिज्ञा केली व अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन त्याच ठिकाणी व्यसनाच सुद्धा त्याग केला.

अशा प्रकारच्या नाटिकेंमधून समाजात व्यसनाधीनतेला पाय बंद होऊन समाज चांगल्या मार्गाला लागेल असा आशावाद येथील मंडळाचे अध्यक्ष आलेले प्रमुख पाहुणे व प्रतिष्ठित व्यक्तींनी व्यक्त केला. 

ब्रह्माकुमारी संस्था अशा प्रकारच्या नाटिकेमधून व संस्थेतर्फे शिकवण्यात येणाऱ्या राजयोग मेडिटेशन कोर्सच्या माध्यमातून समाजातील ताणतणाव दुःख अशांती व व्यसनांना दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असते.  संस्थेचा निशुल्क देण्यात येणारा राजयोग मेडिटेशन कोर्स सर्वांनी आवश्यक करावा असे आवाहन याप्रसंगी राणे नगर सेवकेंद्राच्या  संचालिका ब्रह्माकुमारी विना दिदी यांनी केले.