तुमच्या कुटुंबाच्या व्यवसायाला व्यावसायिक रूप कसे द्यावे आणि त्याची वृद्धी कशी करावी

तुमच्या कुटुंबाच्या व्यवसायाला व्यावसायिक रूप कसे द्यावे आणि त्याची वृद्धी कशी करावी

महाराष्ट्र चेंबर आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तर्फे ‘तुमच्या कुटुंबाच्या व्यवसायाला व्यावसायिक रूप कसे द्यावे आणि त्याची वृद्धी कशी करावी’ या विषयावर चर्चासत्र                                                                  या इव्हेंटमध्ये वुईस्कूलमधील दोन विषयतज्ज्ञ भाग घेतील, जे २१व्या शतकातील व्यवसायविषयक कौशल्यांच्या साह्याने तुमच्या नफ्यात वाढ कशी करावी याविषयी मास्टरक्लासचे आयोजन करतील. *                                                                                                                                                                                      नाशिक, २6 ऑगस्ट २०२२: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (वुईस्कूल) यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्या कुटुंबाच्या व्यवसायाला व्यावसायिक रूप कसे द्यावे आणि त्यात वृद्धी कशी करावी विषयावरील चर्चासत्र एसएसके सॉलिटेअर हॉटेल, अहिल्याबाई होळकर मार्ग, तिडके कॉलनी येथे शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित केले.  हा मास्टरक्लास तरुण व्यवसाय मालकांसाठी/आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात सामील होण्याचा किंवा त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असलेल्या अलीकडेच पदवीधर झालेल्यांसाठी आदर्श आहे. महिला उद्योजक आणि स्टार्टअपचे संस्थापक. भारतातील एसएमई सेक्टरचे एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये ३८ टक्के पेक्षा जास्त योगदान असते आणि त्यातून १०० दशलक्षांहूनही अधिक लोकांना रोजगार मिळत असतो. हे वृद्धीचे इंजिन म्हणून भूमिका बजावत असल्याने त्यात नेतृत्व, विशेषत: कुटुंबाच्या मालकीतील व्यवसायातील नेतृत्व हा महत्त्वाचा भाग असेल.आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाचा कायापालट करतील अशा प्रकारे पुढील पिढीला तयार करण्याची गरज समजून घेऊन वुईस्कूलचा ११ महिन्यांना पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम ईन आंत्रप्र्युनरशिप मॅनेजमेंट शांतपणे तरुण उद्योजक निर्माण करण्यास हातभार लावीत आहे, जे त्यांचा व्यवसाय अधिक उंचीवर घेऊन जात आहेत.‘‘महत्त्वाची बाब ही आहे की, कुटुंबाच्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी त्याला व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड देण्याची गरज असते. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सक्शेशन प्लॅनिंग, व त्यानंतर येणारी मोठी स्पर्धा व बौद्धिक संपदा कायम राखणे ही भारतातील कुटुंबाच्या मालकीच्या व्यवसायासमोरची मोठी आव्हाने असतात. येणाऱ्या पिढीतील उद्योजकांनी जागतिक मानके आणि व्यवसायविषयक सर्वोत्तम आचरणे समजून घेण्याची गरज आहे आणि हा मोफत मास्टरक्लास व्यवसायमालकांना या संकल्पनांचा सामना कसा करावा हे समजून घेण्यास मदत करील. नावनोंदणी करण्यासाठी, 1800123500049 वर मिस्ड कॉल द्या. चर्चासत्रात नावनोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरतर्फे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा, को-चेअरमन संजय सोनवणे, समिती चेअरपर्सन सौ. नेहा खरे  व वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (वुईस्कूल) तर्फे करण्यात आले आहे. अधिक तपशिलांसाठी, संपर्क करा: श्री. अभिजीत : ९९३००६६६८१.