स्वर-रंगमध्ये एस.व्ही.के.टी.महाविद्यालयाचे घवघवीत यश

SVKT-College-has-a-huge-success-in-Svar-Rang

स्वर-रंगमध्ये एस.व्ही.के.टी.महाविद्यालयाचे घवघवीत यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आयोजित स्वर-रंग युवक महोत्सव स्पर्धा- २०२२ विभागीय पातळीवरील स्पर्धा के.टी.एच.एम. महाविद्यालयात संपन्न झाल्या. स्वर-रंग स्पर्धेत श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळालीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. विविध कलाप्रकारात एकूण ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाने एकूण ८ कला प्रकारात बक्षीस प्राप्त केली. त्यापैकी लोक नृत्य, शास्त्रीय नृत्य, मूकनाट्य,प्रहसन, एकांकिका, वादविवाद  कलाप्रकारात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. वैयक्तिक पाश्चात्त्य गायन द्वितीय तर  वैयक्तिक नृत्य संहिता उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राप्त केला.

एकूण 34 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केली. सर्व कलाकारांना साथसंगत देणारे संबळ वादक श्री. रोशन भिसे, पेटीवादक आणि गायक श्री. विक्रम कवठे, ढोलकी वादक श्री. प्रसाद शिंदे, गायक कुमारी धनश्री हगवणे या सर्वांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जयश्री जाधव, प्रा. शशिकांत अमृतकर,  प्रा. संगीता बोराडे, डॉ. रेखा जाधव , प्रा एस. डब्ल्यू. पवार,प्रा.सविता आहेर, प्रा. महेश महाले, प्रा. प्रेरणा शिंदे, प्रा सुनिता कापडी, प्रा. भारती पाटील, प्रा. वैशाली कोकाटे इत्यादीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.सर्व बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन मविप्र संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील ढिकले,उपाध्यक्ष मा. श्री. विश्वास मोरे, सभापती मा. श्री. बाळासाहेब शिरसागर, उपसभापती मा.श्री. देवराम मोगल,, सरचिटणीस मा. अॅड नितीन ठाकरे, चिटणीस मा. श्री. दिलीप दळवी, संचालक मा.श्री. रमेश पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे, उपप्राचार्य प्रा. डी.टी. जाधव, डॉ. सोपान एरंडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग प्राध्यापिकेत्तर वर्ग आणि सर्व पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.