डॉ.प्रेम मसंद यांचे अटॅक मुळे निधन
OM SHANTI, DR PREM MASANT
डॉ.प्रेम मसंद यांचे अस्थमा अटॅकमुळे निधन
माउंट आबू येथील वरिष्ठ राजयोगी व ग्लोबल हॉस्पिटलचे मानद सल्लागार ब्रह्माकुमार .डॉ.प्रेम मसंद यांचे अस्थमा अटॅक मुळे दि. 13 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ब्रह्माकुमारी संस्थेचे डॉक्टर आणि राजयोग अभ्यासक होते.
"सकारात्मक शक्तिशाली उद्देशपूर्ण विचारसरणीचे ते लेखक" होते. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना सक्षम आणि प्रेरित करण्यासाठी त्यांनी जागतिक स्तरावर प्रवास केला.
जीवनाची नवी दृष्टी तयार करा आणि नकारात्मक भावनांना बरे करा, असा त्यांचा संदेश होता. आंतरिक क्षमता जागृत करणे, सकारात्मक शक्तिशाली उद्देशपूर्ण जीवन जगणे, नेतृत्व कौशल्ये आणि युस्ट्रेसचे त्रास, मनाचे रीप्रोग्रामिंग, भीती, राग, नैराश्य आणि अहंकार यावर भावनिक प्रभुत्व, आजारपण ते निरोगीपणा, जीवनातील अनपेक्षित घटनांचे व्यवस्थापन करणे, आनंदाचा गाभा समजून घेणे, आरोग्य, संपत्ती आणि आनंदाचा खजिना अनलॉक करणे, सकारात्मक संबंध, नकारात्मकतेचे ओझे दूर करा, कंपनांची शक्ती इत्यादी विषयावर त्यांनी 8000 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. विविध महाविद्यालये, विद्यापीठे, वैद्यकीय संघटनांमध्ये त्यांनी मल्टीमीडिया सादरीकरण केली आहेत.
नाशिक येथेही त्यांनी अनेक व्याख्यानांमधून ब्रह्माकुमारी संस्थेचा संदेश दिला होता. यापैकी गंगापूर रोड येथील इंजीनियरिंग कॉलेज, HAL संस्था, पिंपळगाव येथील व्यापारी, पोलीस प्रशासन व डॉक्टर्स , नाशिक येथील IMA चे सदस्य डॉक्टर्स, कॅप्रीहांस कंपनी तसेच वसंत व्याख्यानमाला इत्यादी ठिकाणी झालेल्या व्याख्यानांमधून त्यांनी जीवन जगण्याची एक नवी दृष्टी निर्माण करून दिली. त्यांच्या प्रेरणेनेच नाशिक येथील 52 डॉक्टर्स ची टीम माइंड बॉडी मेडिसिन या कॉन्फरन्ससाठी माउंट अबू येथे सहभागी झाली होती.
नाशिक येथील सेवेला एक नवीन उभारी देण्याचे कार्य डॉक्टर प्रेम मसंत यांच्या हातून घडले. त्यांनी केलेल्या सेवेची मोजमाप होऊ शकत नाही. अनेकांचे जीवन परिवर्तन करणाऱ्या अशा या महान आत्म्याला ब्रह्मकुमारी परिवारातर्फे श्रद्धा सुमन अर्पित करते असे भाव ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा प्रमुख ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केले आहेत.