*माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी मुख्यालयात मेडिकल कॉन्फरन्स चे आयोजन*
Bks news
*माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी मुख्यालयात मेडिकल कॉन्फरन्स चे आयोजन*
✓✓नाशिक येथील ६2 डॉक्टरांचे पथक कॉन्फरन्ससाठी सहभागी ✓✓
*आबु रोड (शांतीवन)-* या परिसरात आपण जे काही चांगले सकारात्मक बघितले आपल्याला जे काही चांगले वाटले ते आपल्या सोबत घेऊन जा व आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारा. आपले येथे येणे फक्त येथील सत्र ला हजेरी लावणे नाही, असे व्याख्यान तुम्ही घरी सुद्धा ऐकू शकतात. मात्र येथे येऊन येथील वातावरणाचा अनुभव घेऊन आपल्या घरी सुद्धा असे वातावरण राज योगाद्वारे बनवा. एक व्यक्ती जरी बदलली तर ती संपूर्ण घराचे वातावरण बदलू शकते. राजयोगाने व्यक्तीचे अंतरंग बदलले तर त्याचे बाह्य वातावरण सुद्धा बदलून जाते. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी केले.
*ब्रह्माकुमारी संस्थानाच्या शांतिवन मुख्यालयातील आनंद सरोवर परिसरात मेडिकल विंगच्या 49 व्या माइंड-बॉडी-मेडिसिन या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले. यात देशभरातून एक हजाराहून अधिक विविध क्षेत्रातील आयुष डॉक्टर, वैद्य आणि संशोधक सहभागी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हरिद्वार पतंजली आयुर्वेदचे एमडी आणि सीईओ आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. कौस्तुभ उपाध्याय, सीसीआरएचचे महासंचालक डॉ. सुभाष कौशिक, जोधपूरच्या डीएसआरआरए विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.के. प्रजापती, अतिरिक्त महासचिव राजयोगी बीके बृजमोहन भाई संस्था के कार्यकारी सचिव राजयोगी बीके डॉ. मृत्युंजय, विंग के उपाध्यक्ष डॉ. प्रताप मिड्ढा और सचिव डॉ. बनारसी लाल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.*
याप्रसंगी उपस्थित डॉक्टरांना उद्देशून दीदी बोलत होत्या.
आपल्या अभ्यासू वक्तव्यात पुढे शिवानी दीदी म्हणाल्या की जीवनशैलीमध्ये धन्यवाद शुक्रिया व आभार मानणे समाविष्ट करून घ्यावें यातून नक्कीच आपली आध्यात्मिक शक्ती वाढेल. व सर्व तक्रारी बंद होतील. जो आपले अधिक हित करतो त्याचे सर्वाधिक धन्यवाद आभार व्यक्त करावे यातून आपली आंतरिक शक्ती वाढते.
रात्री झोपण्या पूर्वी सर्वांना दुवा (आशीर्वाद) देऊन झोपावे हे नक्कीच आपल्या मनातील दुःखांना दवाचे (औषधाचे) काम करेल असेही दीदींनी याप्रसंगी नमूद केले.
कोणीही आपल्याकडे येत असेल तर त्याच्याविषयी विचारनिर्मित करावा की हा माझ्या फायद्यासाठीच आला आहे. ती व्यक्ती आपणास नुकसान करण्यासाठी जरी येत असेल तरी त्याची मानसिकता बदलून जाईल इतकी या विचारांमध्ये शक्ती आहे. जे काही मिळाले आहे ते माझ्यासाठी अतिशय योग्य व कल्याणकारी आहे, या विचारांनी कर्म केल्यास मिळालेली गोष्ट त्या वेळेपासून कल्याणकारी होण्यास सिद्ध होते. अशा प्रकारचे अनेक प्रेरक विचार ऐकून उपस्थित डॉक्टरांनी याची देही याची डोळा आपल्यात परिवर्तनाची जाणीव केली.
उद्घाटनप्रसंगी हरिद्वार येथून आलेल्या पतंजली आयुर्वेदचे एमडी आणि सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही पॅथीचे विरोधक नाही आहोत, जो लुटमार करेल, त्याचा आम्ही विरोधक आहोत, मग तो आयुर्वेदिकच का असेना. जेव्हा एखादा रुग्ण आमच्याकडे येतो, तेव्हा तो आम्हाला देवाच्या दृष्टीने पाहतो, परंतु जर आपल्या मनात लूट आणि पैसे कमवण्याची भावना असेल, तर यापेक्षा मोठे पाप नाही. जे खरे आणि प्रामाणिक चिकित्सक आहेत, त्यांच्यासोबत आम्ही नेहमी उभे आहोत, मग ते कोणत्याही पॅथीचे असोत. आज लोभ इतका वाढला आहे की आधी आजारी केले जाते आणि नंतर उपचार केले जातात.
आचार्य पुढे म्हणाले, आयुर्वेदात नाडी वैद्याची मोठी महिमा आहे. परंतु नाडी विज्ञान शिकण्यासाठी आपले मन शांत आणि शक्तिशाली असणे आवश्यक आहे. जितके आपण अंतर्मुख होऊ तितके नाडी विद्या खोलवर समजून घेऊ शकता. जसजसे आपण जगातील ज्ञान घेत आहोत तसतसे आपल्या ज्ञानापासून दूर होत आहोत, त्या दूराव्याचा नाश करणे म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे हरवलेले शोधण्याचा प्रवास नाही, तर ते आपल्यामध्ये शोधण्याची गोष्ट आहे. अंतर्यात्रा करणे म्हणजे अध्यात्म आहे. ब्रह्माकुमारींच्या मार्गावर चालल्याने आपली ती यात्रा पूर्ण होऊ शकते. आत्मज्ञान देणारा एक परमात्मा आहे. मानव आत्म्याने शक्तिशाली बनतो आणि त्यामुळे तो मोठमोठे कार्य करू शकतो. आत्मयात्रेच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहा. ब्रह्माकुमारी संस्थेत मानवाला सात्विक बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
या कार्यक्रमासाठी येथील तज्ञ डॉक्टर सतीश गुप्ता, मोटिवेशनल स्पीकर शिवानी दीदी, ब्रह्माकुमारी उषा दीदी, डॉ. मोहित गुप्ता, डॉ. स्वामीनाथन, ब्रह्माकुमार डॉ. सचिन भाई, वरिष्ठ राजयोगी सूरज भाईजी, डॉक्टर रीना तोमर, डॉक्टर स्वप्न गुप्ता आदींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
*नाशिक येथील निमा नवीन नाशिकचे 62 डॉक्टर्स चे पथक जिल्हा मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या मार्गदर्शनात कॉन्फरन्ससाठी सहभागी झाले होते.*
कार्यक्रमाच्या सांगतेला आमंत्रित डॉक्टर्सनी येथील ज्ञानसरोवर पांडव भवन स्पार्क इत्यादी प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयातील या कॅम्पसला भेट देऊन नवीन ऊर्जा नवा उत्साह घेऊन आम्ही पुढील कार्यासाठी सज्ज झालो आहोत, असे मनोगत येथील सहभागी डॉक्टर्सनी व्यक्त केले. आपल्या स्थानीय केंद्रावर जाऊन ब्रह्माकुमारी संस्थेचा पुढील डिटेल राजयोग आपण करणार आहोत. आपल्या सहकारी मित्रमंडळी व आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना सुद्धा हा राजयोग कोर्स रेफर करू असे सहभागी डॉक्टर्स ने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन डॉ अभिनंदन कोठारी, डॉ राजेश जावळे व डॉ गुरुदेव बिरारी यांनी केले.