मी पणामुळे अहंकार तर माझे म्हणण्यामुळे मोह जागृत होतो - ब्रह्माकुमारी विना दीदी

मी पणामुळे अहंकार  तर माझे म्हणण्यामुळे मोह जागृत होतो - ब्रह्माकुमारी विना दीदी
मी पणामुळे अहंकार  तर माझे म्हणण्यामुळे मोह जागृत होतो - ब्रह्माकुमारी विना दीदी

मी पणामुळे अहंकार  तर माझे म्हणण्यामुळे मोह जागृत होतो - ब्रह्माकुमारी विना दीदी

प्रश्नमंजुषा क्रमांक आठ व नऊ चे तीन-तीन विजेते घोषित करण्यात आले यापैकी प्रश्नमंजुषा क्रमांक आठ प्रथम क्रमांक पांडव नगरीतील मयुरी नानकर , द्वितीय क्रमांक मकरंद मालपुरे, तृतीय क्रमांक निशिका मालपुरे यांचा आला. प्रश्न मंजुषा क्रमांक नऊच्या विजेतांमधून प्रथम क्रमांक सुजाता महाजन, द्वितीय क्रमांक सुधीर पारखी, तृतीय बक्षिस प्रतिमा पैठणकर यांनी मिळविले

इंदिरानगर - पूर्ण दिवसात आपण मी व माझे या दोन शब्दांचा सर्वाधिक वापर करतो.  जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये माझे माझे मी याविषयीचा पण अधिक बोलत असतो या मीपणामुळे आपल्यात अहंकार  तर माझे म्हणण्यामुळे मोह जागृत होत असतो. हा मोह आपल्याला खूप दुःखी करत असतो. 

 संसार म्हणजे एक नाटिका आहे. ना टिका अर्थात कोणतीही गोष्ट कधीही न टिकणारी .  आपले संबंध असो वस्तू असो वैभव असो हे कधीच टिकणारे नसते.  हे विनाशी आहे.  हे आपल्याला सोडून जायचेच असते किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून जात असतात.  त्यामुळे या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा मीपणा न ठेवता मोहा मध्ये न टाकता जन्म मरणाच्या या चक्रामधून आपण अलिप्त व्हावे. ह्या  सृष्टीवरील नाटकाचा दुसरा अर्थ सुद्धा ना+ अटक असा होतो. म्हणजेच आपण या विनाशी भौतिक वस्तूंमध्ये कुठेही अटकू नये व परमात्म्यासोबत आपले संधान साधावे. जेणे करून आपण संसारातील मोहपाशापासून अलिप्त होऊ शकू, असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी विणादिदी यांनी केले. 

दिनांक 21 एप्रिल रोजी साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे प्रश्नमंजुषा सोडत या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारी राजयोग सेवा केंद्र, मनपा गार्डन कैलास नगर येथे करण्यात आले. याप्रसंगी दीदी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज कॉम्प्युटरच्या संचालिका हर्षदा गीते मॅडम उपस्थित होत्या.  संस्थेचा परिचय ब्रह्माकुमारी सुवर्णमाता यांनी केले तर प्रास्ताविक साप्ताहिक नाशिक परिसर चे संपादक दिलीप बोरसे यांनी केले. 

कार्यक्रमात उपस्थित वाचकांमधून प्रश्नमंजुषा क्रमांक आठ व नऊ चे तीन-तीन विजेते घोषित करण्यात आले यापैकी प्रश्नमंजुषा क्रमांक आठ प्रथम क्रमांक पांडव नगरीतील मयुरी नानकर , द्वितीय क्रमांक मकरंद मालपुरे, तृतीय क्रमांक निशिका मालपुरे यांचा आला. प्रश्न मंजुषा क्रमांक नऊच्या विजेतांमधून प्रथम क्रमांक सुजाता महाजन, द्वितीय क्रमांक सुधीर पारखी, तृतीय बक्षिस प्रतिमा पैठणकर यांनी मिळविले

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हर्षदा गीते यांनी ब्रह्माकुमारी संस्था करीत असलेल्या कार्याचा गौरव केला. दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोगा मेडिटेशन अतिशय उपयुक्त असून हा राजयोग मेडिटेशन चा कोर्स मला अवश्य करायला आवडेल असे मनोगत गीते मॅडम यांनी व्यक्त केले. 

 संपादक दिलीप बोरसे यांनी प्रस्तावनेतून साप्ताहिक नाशिक परिसराच्या 14 वर्षा चा इतिहास उलगडत वाचक व जाहिरातदारांसाठी करीत असलेल्या कार्याची माहिती प्रस्तुत केली. वाचकांच्या प्रेरणेतून प्रश्नमंजुषा सारखे सदर चालू करून जाहिरातदारांची जाहिरात ठळकपणे घराघरात पोहोचवण्याचा मानस संपादक बोरसे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमात प्रश्नमंजुषा बरोबर सोडवलेल्या वाचकांची मोठ्या संख्येने   उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सफल नियोजन साप्ताहिक नाशिक परिसराच्या टीमने केले. यात प्रामुख्याने सचिन मोरे, गणेश लोहार  राजेश जाधव पांडुरंग दाभाडे प्राजक्ता मोरे अमीन शेख आदींचा चांगला सहयोग लाभला.  ब्रह्माकुमारी कैलास नगर गीता पाठशाळेतील साधकांनी कार्यक्रमासाठी विशेष सहयोग दिला.