नवनिर्वाचित लोकसभा खासदारांचा ब्रह्माकुमारी आश्रमात सत्कार
brahmakumaris, trambak, MLA,
तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यासाठी राजयोग मेडिटेशन अवश्य…. ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी
नवनिर्वाचित लोकसभा खासदारांचा ब्रह्माकुमारी आश्रमात सत्कार
कोपरगाव- येथील ब्रह्माकुमारी संस्थे मध्ये सुद्धा सन्माननीय खासदार श्री .भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांचा सत्कार ब्रह्माकुमारी सरला दीदी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ब्रह्माकुमारी चैताली दीदी , वाकचौरे यांचे स्वीय सहाय्यक श्री .शंकर सिंगर, ब्रह्माकुमार संदीप भाई आदी मान्यवर उपस्तित होते. |
नाशिक - समाजसेवेचे व्रत घेऊन आपण नाशिकचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर करीत आहात आपल्या राजकीय जीवनात तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राज योग मेडिटेशन चा समावेश आपल्या जीवनात केल्यास आपले जीवन अधिक सुखमय व तणाव मुक्त होईल, अध्यात्मिक उन्नतीने आपण कार्य केल्यास निश्चितच समाजसेवेला सुद्धा बळ मिळेल अशा शब्दात राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी नवनिर्वाचित लोकसभा खासदारांच्या सत्कार कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या.
येथील म्हसरूळ कलानगर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या स्थानीय मुख्य सेवा केंद्र प्रभू प्रसाद सभागृहात दिनांक 7 जुलै रोजी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव श्री भास्करराव भगरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील डीआरडीओ चे निवृत्त अधिकारी ब्रह्माकुमार शिव सिंगभाई उपस्थित होते.
आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांच्या हस्ते सत्कारित झाल्यानंतर शोभाताई बच्छाव यांनी सांगितले की ब्रह्माकुमारी संस्थेसोबत मी खूप पूर्वीपासून जुळले गेले आहे. माझे अनेक नातेवाईक संस्थेचे नियमित सदस्य आहेत. मी सुद्धा बऱ्याच वेळेस संस्थेचे मुख्यालय माउंट आबू येथे जाऊन येथील मेडिटेशन चा अनुभव घेतला आहे. संस्थेचे कार्य अतिशय महान असून मला माझ्या दैनंदिन जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी व दैनंदिन कार्य निर्वीघ्न पार पडण्यासाठी संस्थेच्या राजयोगा मेडिटेशन चा खूप लाभ होतो. माझा स्वानुभव आहे की या मंदिरात जो कोणी येईल त्यांना आत्मिक समाधान मिळेल, त्यांचे आयुष्यातील ध्येय निश्चित पूर्ण होतील. प्रत्येकाने पाच मिनिटे तरी संस्थेच्या सननिध्यात येऊन अनुभव केला पाहिजे असे शोभाताईंनी नमूद केले.
नवनिर्वाचित खासदार भास्करराव भगरे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की एक शिक्षक या रूपाने मला जनसेवेची संधी मिळाली. ज्याप्रमाणे ब्रह्माकुमारी संस्था अध्यात्मिक मार्गाने समाजाची सेवा करीत आहे मी सुद्धा राजकीय मार्गाने समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. दीदींच्या हस्ते सन्मान होणे हे मी माझे भाग्य समजतो. ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य मी ओळखून होतो. परंतु सान्निध्यात येण्याचा योग आज लाभला. संस्थेला माझ्या परीने सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन, असे भगरे सरांनी सांगितले. मात्र यावर आदरणीय ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी त्यांना कुठलाही सहयोग करण्याआधी संस्थेचा साप्ताहिक राजयोग कोर्स करण्याचे आवाहन केले, जे भगरे सरांनी सहर्ष स्वीकारले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कौन्सलिंग व मेंटल हेल्थ या विषयावरील पदवी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने संस्थेचे सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी तर पाहुण्यांचे स्वागत ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी केले.