गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची सभा
नाशिक: येथील गोए सो च्या परिचर्या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022 23 मधील रॅगिंग प्रतिबंधक समितीची प्रथम सभा प्राचार्य डॉ.ज्योती ठाकूर व संस्थेचे विशवस्त डॉ. पी आर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉक्टर सरोज उपासने उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते जसे पोलीस खाते मधून श्री रियाज शेख सहाय्यक पोलीस अधीक्षक व श्री बागुल गोपनीय पोलीस अधिकारी, गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. प्रतिभा औंधकर ,वैद्यकीय अधीक्षक रेड क्रॉस सोसायटी, नाशिक ,लोकल मीडिया प्रतिनिधी म्हणून गायत्री जेऊघाले न्यूज रिपोर्टर, महाराष्ट्र टाइम्स नाशिक, तसेच प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून श्रीमती मनीषा पिंगाळकर, विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षण क्षेत्र जिल्हा परिषद नाशिक, पालक प्रतिनिधी म्हणून सौ जयश्री झांबरे व सौ जिमोल मनोज, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी पायल उघडे प्रथम वर्ष बीएससी नर्सिंग व ज्ञानेश्वर शिंपणकर द्वितीय वर्ष बीएससी नर्सिंग, शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापिका योगिनी ठोंबरे ,रोहिदास बिरे, मायावती तुपेरे, शिक्षकेतर प्रतिनिधी म्हणून मोनिका प्रगाणे व शिंदे संदेश यासोबत समितीच्या समन्वयक प्राध्यापिका मनीषा गावंजे आदी उपस्थित होते.
उपस्थित प्रतिनिधींच्या स्वागत सत्कार नंतर सभेस सुरुवात करण्यात आली यावेळी मनीषा गावंजे यांनी मागील चर्चासत्राचा थोडक्यात आढावा सादर केला. योगिनी ठोंबरे यांनी रॅगिंग प्रतिबंधासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
यानंतर उपस्थितांच्या प्रतिक्रिया/ मार्गदर्शन या विषया अंतर्गत पीएसआय रियाज शेख यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग बाबत कायदेशीर जाणीव करून दिली पाहिजे तसेचं अगदी छोट्या गोष्टींपासूनही म्हणजे गंमत मस्ती करत असतानाही विद्यार्थ्यांकडून अजाणतेपणे रॅगिंग होते व त्याचे रूपांतर मोठ्या गोष्टीत होते अशा प्रकारच्या गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग प्रतिबंधक ते बद्दल जागरूकता निर्माण करून त्याचे प्रबोधन केले पाहिजे व विद्यार्थ्यांसाठी त्याविषयीचे चर्चासत्र आयोजित केले पाहिजे. गोपनीय अधिकारी बागुल यांनी विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या रॅगिंग प्रकाराचे काही उदाहरणे सभासदांसमोर सादर केले. विस्तार अधिकारी मनीषा पिंगाळकर यांनी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीलाच रॅगिंग प्रतिबंधक विषयावर व्याख्यान आयोजित करून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे, असे सांगितले. डॉ. प्रतिभा औंधकर यांनी 2015 पासून या समितीवर सभासद असून आत्तापर्यंत एकही रॅगिंग केस घडली नसल्याकारणाने महाविद्यालयाचे कौतुक केले, व विद्यार्थ्यांकडून रॅगिंग प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता महाविद्यालयाने तसेच समितीतील सभासदांनी घेतली पाहिजे असे मत मांडले. न्युज रिपोर्टर गायत्री जेऊघाले यांनी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र चर्चासत्र राबवून त्यांच्यामधील धैर्य वाढविले पाहिजे हे सांगितले. पालक प्रतिनिधींनी महाविद्यालयाच्या शिस्तप्रिय वातावरणाचे कौतुक केले.
विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रतिबंधासाठी महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली.
यानंतर प्राध्यापिका योगिनी ठोंबरे यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली .