आध्यात्मिक जीवनशैली अंगिकारल्यास सामाजिक जबाबदारीचे भान राहून संतुलीत वृत्तांकन करण्यास मदत होईल असा आशावाद धामणगाव गढी येथे विदर्भस्तरीय पत्रकारांच्या कार्यशाळेत वक्त्यांनी केला.

आध्यात्मिक जीवनशैली अंगिकारल्यास सामाजिक जबाबदारीचे भान राहून संतुलीत वृत्तांकन करण्यास मदत होईल असा आशावाद धामणगाव गढी येथे विदर्भस्तरीय पत्रकारांच्या कार्यशाळेत वक्त्यांनी केला.
आध्यात्मिक जीवन पद्धती माध्यम प्रतिनिधींसाठी आवश्यक माध्यमांनी सामाजिक जबाबदारीने वृत्तांकन करण्याकरीता आध्यात्मिकता आवश्यक विदर्भस्तरीय माध्यम कार्यशाळेतील वक्त्यांचा आशावाद

परतवाडा/नागपूर, दि. 25 (प्रतिनिधी) माध्यमांनी आपले कर्तव्य बजावित असतांना आपल्या प्रकाशन, प्रसारण आणि प्रक्षेपणात मूल्याधिष्ठीत दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे, आध्यात्मिक जीवनशैली अंगिकारल्यास सामाजिक जबाबदारीचे भान राहून संतुलीत वृत्तांकन करण्यास मदत होईल असा आशावाद धामणगाव गढी येथे विदर्भस्तरीय पत्रकारांच्या कार्यशाळेत वक्त्यांनी केला.

मीडिया विंग [RERF], ब्रह्माकुमारीज्, माऊंट आबू, राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य व अचलपूर तालुका मराठी पत्रकार संघ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवदर्शन म्युझियम धामणगाव गढी येथे मीडिया, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तन विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम मधील थ्रीडी राजयोग मेडिटेशन हॉलचे उदघाटन आणि कार्यशाळेचे उदघाटन उपरोक्त मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.  कु. विनीका जोशी, धामणगाव गढीने स्वागृत नृत्याद्वारे उपस्थितांचे स्वागत केले. ब्र.कु. लता दीदीजी, संचालिका, परतवाडा सेवाकेंद्र यांनी स्वागत संबोधन केले.

सामाजिक जबाबदारीचे भान माध्यमांनी ठेवावे :

प्रास्ताविक करतांना  डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र समन्वयक, मीडिया विंग, जळगाव यांनी स्पष्ट करतांना सांगितले की मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या मीडिया प्रभागाद्वारे देशभरात मूल्यनिष्ठ पत्रकारितेचे विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जात आहेत. आध्यात्मिक जीवनशैली आत्मसात केल्यास दैवी गुणांनी सुगंधीत जीवन बनून सामाजिक जबाबदारी पूर्ण करता येईल.  कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करतांना  श्री. नितेश किल्लेदार,प्रदेश अध्यक्ष,राज्य मराठी पत्रकार परिषद, अमरावती यांनी माध्यमांनी केवळ वृत्तांकन करण्याचे कार्य न करता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद करीत असलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा आढावा घेतला. ब्रह्माकुमारीज् सातत्याने माऊंट आबू येथे पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन वर्षातून दोन वेळा आयोजित करुन मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी करीत असलेल्या प्रयत्नाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

संजय सारखी निपक्ष भूमिका माध्यमांनी करावी:

मीडिया, अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारी या मुख्य विषयावर बोलतांना राजयोगी बीके डॉ.शांतनू भाईजी, राष्ट्रीय संयोजक,मीडिया विंग,ब्रह्माकुमारीज् ,मा.आबू यांनी अध्यात्म म्हणजे केवळ भगवे वस्त्र परीधान करुन सांसारिक जबादारीतून मुक्त होणे नव्हे तर आंतररीक संसार अर्थात मनातील विषय विकार, व्यसन, अवगुणांचा त्याग करुन मूल्यनिष्ठ जीवन जगणे होय अशी आध्यात्मिकतेची परिभाषा केली. मूल्यनिष्ठ पत्रकारितेबाबतीत मीडिया प्रभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमांचाही त्यांनी या प्रंसगी आढावा घेतला.  प्राचिन काळी नारद आणि संजय या व्यक्तिरेखा म्हणजे आद्य प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी होते असेही ते म्हणाले. संजय च्या भूमिकेचा विशेष आधार घेऊन त्यांनी सांगितले की महाराज धुतराष्ट्र यांना संजय ने जे दिसते आहे ते तसे च्या तसे सांगितले आपले मत कुठलेही लादले नाही. यावरुन माध्यम प्रतिनिधींनी सत्य मुल्यांकन करावे असेही ते म्हणाले.

सकात्मक बातम्या मुखपृष्ठावर :

  श्री. राजेश राजोरे, संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा आवृत्ती, खामगाव आपल्या मनोगतात सांगितले की सकारात्मकतेला मुखपृष्ठावर स्थान देऊन लोकांची सकाळ सकारात्मक करण्यावर भर देणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर रक्तरंजीत, बलात्कार, खून यांच्या बातम्या न छापता त्या आतल्या पानावर छापण्याची सुरुवात काही दैनिकांनी केली आहे. अध्यात्मची व्याख्याच मुळी `आधी आत्म` ही असल्याने आत्मभाव ठेवल्यास जगातील बरेच प्रश्न सुटतील असेही त्यांनी सांगितले.

आभार प्रा. ललित कांबले, जिला अध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार संघ, परतवाडा यांनी केले तर  कार्यशाळेचे कुशल संचलन आणि राजयोग अभ्यास  बीके अविनाश भाईजी, प्रबंधक, शिवदर्शन म्युझियम, धामणगाव गढी यांनी केले.   कार्यक्रमासाठी निलेश किल्लेदार, ललित कांबळे, संजय अग्रवाल, भारत थोरात, आशिष गवई, अनिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

 

जीवनगौरव तथा नवदर्पण पुरस्कार :

याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेतर्फे विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ सेवा करणा·या व्यक्तिंना  जीवनगौरव तथा नवदर्पण पुरस्कार देऊन पुढील मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले. राजयोगिणी 

ब्र.कु. लतादीदी, ब्र.कु. डॉ. शांतनुभाई, डॉ. सोमनाथ वडनेरे, ब्र.कु. अविनाशभाई, राजेश राजोरे, दिलीप बोरसे, डॉ. आयुष महेंद्र  सांगोले, रेटीना सर्जन, ज्ञानेश्वर राऊत, अध्यक्ष गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. कल्पेश तीवारी, शल्य चिकित्सक, जे सी रवि गुप्ता, फार्मासीस्ट, लॉयन पंकज गुप्ता, उद्योजक, लॉयन निलेश गावंडे, सपना ज्वेलर्स के संचालक उद्योजक, संजीवकुमार डागा, उद्योजक, रितेश दिलीपराव पोटे सुषमा थोरात, मंगेश गायकवाड, अरुण वानखेडे, माजी नगराध्यक्ष, बन्टी केजरीवाल, आशिष गवई, सुषमा थोरात ,किरण युवराज गुप्ता.

फोटो कॅप्शन

1.  विदर्भस्तरीय मीडिया कार्यशाळेचे उदघाटन करतांना मान्यवर

2. विदर्भस्तरीय मीडिया कार्यशाळेस संबोधित करतांना बी.के. शांतनुभाई, राष्ट्रीय समन्वयक. माऊंट आबू.

मा. संपादक,

कृपया उपरोक्त वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावे ही विनंती.

डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव

महाराष्ट्र राज्य संयोजक

मीडिया प्रभाग,