शेअर बाजार; सेन्सेक्स ५००, तर निफ्टी १०३ अकांनी वधारला
मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीने उघडले आहेत. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारातील वाढीमुळे बाजारात ही तेजी वाढली आहे. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५०० अंकांच्या वाढीसह ५९,१४१ वर उघडला, तर निफ्टी निर्देशांक १७,६२५ वर उघडला. सध्या सेन्सेक्स ४६९ आणि निफ्टी १३८ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे सेन्सेक्सने पुन्हा ५९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
दुसरीकडे, जॅक्सन होलमध्ये फेड अध्यक्षांच्या भाषणापूर्वी गुरुवारी अमेरिकन बाजारात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकन बाजार दिवसाच्या उच्चांकावर बंद झाले. डाऊ जोन्स २३२ अंकांच्या वाढीसह बंद झाला. Nasdaq २०८ वर वाढला. रोखे उत्पन्न ३% पर्यंत घसरले, ब्रेंट क्रूड $१०० च्या खाली घसरले.
त्याचवेळी गुरुवारी भारतीय बाजारात ३६९9 कोटी रुपयांची रोख खरेदी झाली. दुसरीकडे, DII ने बाजारातून ३३४ कोटी रुपये रोख बाहेर काढले. भारतीय बाजारात नेल्कोच्या समभागांनी १० टक्क्यांपर्यंत झेप घेतली, तर आरबीआय ३ टक्क्यांनी मजबूत झाला.