
दिनांक. 27/02/2026 रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र वृंदावन कॉलनी, इंदिरा नगर, नाशिक येथे मा.डॉ.विजय देवकर सर (वैद्यकीय आरोग्य अधिकारी), डॉ.अजिता साळुंखे मॅडम (सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी), डॉ. अशोक गायकवाड सर (विभागीय वैद्यकीय अधिकारी – East Division), डॉ. आशिष पाटोळे सर वडाळा गाव UPHC वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली *हिंद दी चादर ” श्रीगुरु तेंग बहादूर साहेब जी ” यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
NCD स्क्रीनिंग ( BP monitoring checkup , BSL checkup), लहान मुलांच (Height weight & tempreture ) व वृद्ध व्यक्तींची आरोग्य तपासणी गरोदर मातांची तपासणी केली, तसेच त्यांना गरोदरपणात घेण्याची काळजी, हेल्थ चेकअप, योग्य आहार विहार याबाबत माहिती दिली, तसेच लहान मुलांना योगा घेऊन व आरोग्य विषयी माहिती देऊन खजूर वाटप करण्यात आले व महिलांना मासिक पाळी मधील आहाराची आणि स्वच्छता विषयीची माहिती दिली .
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा कुटे आणि सर्व स्टाफ, आशा ताई उपस्थित होते.

