नाशिक:
आज नाशिक जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री जनार्दन गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सध्याच्या काळात वाढती महागाई, गॅरेजचे भाडे, विजेचे बिल, कामगारांचे पगार, वॉशिंग, पेट्रोल-डिझेल तसेच इतर व्यावसायिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे टू-व्हीलर गॅरेज व्यवसायातील लेबर चार्जेसमध्ये योग्य ती वाढ करणे ही काळाची गरज बनली आहे.
यावर बैठकीत सविस्तर चर्चा करून टू-व्हीलर वाहनांच्या ‘फुल सर्व्हिसिंग लेबर चार्जेस’ बाबत नवीन दरपत्रक निश्चित करण्यात आले.
तसेच नाशिक शहरातील प्रत्येक विभागातील मेकॅनिक बांधवांपर्यंत या निर्णयाची माहिती पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सिडको, सातपूर, लिंक रोड, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, सारडा सर्कल, नाशिक रोड, जेल रोड, आडगाव नाका, पंचवटी, गंगापूर रोड, नांदूर नाका अशा सर्व भागांत टप्प्याटप्प्याने बैठका घेऊन नवीन दरांसंदर्भात जनजागृती केली जाईल व मेकॅनिक बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.
💥प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती:💥
*श्री. सचिन काळे, सादिक बेग, भरत झांबरे, हबीब शेख, वसीम शेख, संजय ढोले, प्रवीण खैरनार, हेमंत मनतोडे, पंडित सत्येंद्र, मंगेश अभंग, नौशाद शेख, चेतन पाटील, शैलेश भुजंगे, शशिकांत लोणारी, सतीश बागुल, संजय उगले, सुमित जाधव, वैभव शिवले,नामदेव कवडे, विजू कोल्हे, भरत देशमुख, जितेंद्र परदेशी, योगेश खैरनार, सचिन बेलदार ,मुन्ना मोरे, बापू काळे, ललित काळे,अमोल बानाईत, माधव मोरे, तालीप शहा, नौशाद खान, रामविलास, नितीन देशमुख, गणेश जंजवाळ, योगेश, विलास आडोले ,किरण पराडे, चांद शेख, सुनील गाडेकर, सुभाष कुमावत, श्याम बाबू,सातपूर मधील पदाधिकारी* तसेच इतर पदाधिकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏💥🙏💥🙏💥🙏
सर्व मेकॅनिक बंधूंना रेट संदर्भात मार्गदर्शन केल्यानंतर जे कोणी मेकॅनिक बांधव रेट चे पालन करणार नाही त्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे असा नियम असोसिएशनच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे
🙏🌹🙏🌹🙏🌹


