नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा, उत्तर महाराष्ट्रच्या सचिवपदी मा. श्री. चंद्रकांत थोरात यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रकांत थोरात यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओबीसी समाजातील विविध घटकांना संघटित करून त्यांच्या हक्क व विकासासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची संधी त्यांना या माध्यमातून मिळणार आहे.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच समाजातील वंचित घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा व विकासकामे पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

त्यांच्या निवडीबद्दल साप्ताहिक नाशिक परिसरचे संपादक बी.के. दिलीप बोरसे, ब्रह्माकुमारी वंदना, समाधान पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

