आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने सनशाईन व रेनबो स्टार किड्स इंटरनॅशनल प्रीस्कूल येथे पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमांसह हरिनामाचा गजर करत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, भक्तीभाव आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यास प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती बडगुजर , सर्व शिक्षकवृंद सौ. रोहिणी शिरसाठ, सौ. नुतन पवार , सौ. सारिका शिंपी, सौ. सुवर्णा भालेराव , सौ . माधुरी शेळके, सौ. सोनाली पाटील,सौ अर्चना व पालक यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले. उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

