

नाशिक (प्रतिनिधी) येथील मेलोडियस कराओके क्लबतर्फे मंगळवारी ( दि.३१) ‘ मेलोडियस रॉयल ‘ ही सुमधुर गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश मिळेल. संयोजक उदय पाटील यांनी अशी माहिती दिली.


संचालक उदय पाटील यांच्यासह जयश्री पाटील यांनी या मैफलीचे आयोजन केले आहे. मोहन पवार व अनिल पोटे यांचे सहकार्य लाभले आहे. जयंत चांदवडकर, रोशन कुलकर्णी, प्रदीप गवई, सचिन सावंत, राहुल बिडवई, देवनाथ राखाल, विनोद राठोड, दीपक जाधव, रितेश पाटील हे गायक आणि अंजली देशमुख, प्रिती दीक्षित, मिता डोगरा, पौर्णिमा गुप्ता, स्नेहा केदारे, राजश्री मानकुंबरे या गायिका सुमधुर गाणी सादर करतील.


अफलातून म्युझिक लव्हर्सचे अध्यक्ष हरिश ठक्कर पाहुणे गायक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व रसिक श्रोत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. नाशिककरांनी उपस्थित राहून गाण्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


