कोपरगाव तालुक्यात दर्डे-चांदवड येथे राजयोग ध्यानसाधना केंद्राचे भूमिपूजन संपन्न
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील दर्डे-चांदवड येथे राजयोग (मेडिटेशन) ध्यानसाधना सेवा केंद्राच्या वास्तूचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती परमश्रद्धेय राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी (नाशिक), श्री क्षेत्र कुंभारीचे मठाधीपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, राजयोगिनी ब्रह्माकुमारीज सरला दीदी, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आदी मान्यवरांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
तसेच देर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रतिभाताई गायकवाड, मढी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण निंबाळकर, कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. चंद्रकला सूर्यभान कोळपे, सुरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुमनताई कोळपे, सौ. शकुंतलाताई कोल्हे, इंजिनियर दत्ता जाधव, इंजिनियर शैलेश आसने, देवेंद्र गवारे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी राजयोग ध्यानसाधना सेवा केंद्राच्या वास्तूविषयी सविस्तर माहिती राजयोगिनी ब्रह्माकुमारीज सरला दीदी यांनी दिली. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या मनोगतातून केंद्राच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व समाजातील आध्यात्मिक जागृतीसाठी अशा केंद्रांची गरज अधोरेखित केली.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ताभाई बडे (नाशिक), अभिजीत कुवर (नाशिक), संदीप भोसले, गणेश मोरे, सुरेश नाना शिलेदार तसेच ब्रह्माकुमारी परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
दर्डे-चांदवड परिसरात उभारण्यात येणारे हे राजयोग ध्यानसाधना सेवा केंद्र समाजातील नागरिकांना अध्यात्म, मूल्याधिष्ठित जीवनशैली व मानसिक शांततेचा मार्ग दाखविणारे ठरणार आहे.

