नाशिक रोड (प्रतिनिधी)-बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, नाशिक रोड येथे अनोळखी रिक्षा चालकाने दि.१३जून रोजी रात्री ८.४० वा. च्या सुमारास अपंग महीलास रेहाना फईम शेख रा. मु.पो. येवला, जुना नगरपालिका रोड, ता. येवला जि. नाशिक हीस दमबाजी करून तिचे हातातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम कार्ड हिसकान घेवुन सदर अंपग महीलेला रिक्षातून खाली जोरात ढकलुन देवुन रिक्षा घेवुन पळून गेला होता. तसेच त्याने अंपग महीलेच्या खात्यातून वेळो वेळी एकुन २३,००० रुपये काढून घेवुन जबरी चोरी केली होती. सदर अंपग महीलेने नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर अनोळखी इसमाचा व रिक्षाचा काहीएक ठाव ठिकाणा नसतांना गुन्हेशोध पथकातील प्रविण सुर्यवंशी,योगेश रानडे, रोहीत शिंदे,अरूण गाडेकर यांनी वारंवार घटनास्थळावरील व गुन्हयाचे अनुषंगाने ठिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन गोपनिय माहिती घेऊन सदर रिक्षा जेलरोड पटट्यावर चालणारी असल्याचे समजले.गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, विष्णु गोसावी, महेंद्र जाधव, सागर आडने, यांनी सापळा रचुन रिक्षा क्र. MH 15 AK 6599 ही व त्यावरील संशयीत चालक नामे प्रविण आनंद नेटावणे रा. शांतीपार्क, ईच्छामणी मंदीराचे मागे, उपनगर, नाशिकरोड यास ताब्यात घेऊन एटीएम चोरून २३,०००/-रू रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली ८०,०००/- रू कि. रिक्षा असा एकुन १,०३,०००/- रू कि. मुददेमाल जप्त केला.सदर उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त, मोनिका राऊत, सहपोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी, याचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे),प्रविण सुर्यवंशी, संदिप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे विशाल पाटील, विष्णु गोसावी, देवरे, महेंद्र जाधव, गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे,संतोष पिंगळ, योगेश रानडे आदीने केले.


