
कोल्हापुर : ब्रह्माकुमारीजच्या मेडिकल विंग आणि कोल्हापुर मेडिकल असोसिएशन (KMA) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील केएमए हॉलमध्ये “माइंड बॉडी मेडिसिन कॉन्फरन्स”चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कॉन्फरन्समध्ये “Stress to Bliss – Transforming Your Daily Life” या विषयावर नाशिक येथील रेडियोलॉजिस्ट डॉ. राजेश जावळे यांनी मार्गदर्शन करताना ताणतणावमुक्त जीवनासाठी सकारात्मक विचारसरणी, ध्यान आणि जीवनशैलीतील बदल यांचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच “Holistic Care” या विषयावर पनवेल येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभदा नील यांनी आपले अनुभव मांडले. त्यांनी रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

ब्रह्माकुमारीज कोल्हापुर व पुणे विभागाच्या इंचार्ज बीके सुनंदा दीदी यांनी उपस्थितांना राजयोग मेडिटेशनची माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या आशीर्वचनांनी कार्यक्रमाला प्रेरणादायी दिशा मिळाली. बीके सुनीता दीदी यांनी कॉन्फरन्सचा उद्देश स्पष्ट करत ब्रह्माकुमारीज संस्थेची माहिती दिली, तर बीके डॉ. रश्मी दीदी यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आत्मीय स्वागत केले.

या कार्यक्रमास कोल्हापुर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी, मानद सचिव डॉ. अरुण धुमाळे, कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन अडनाईक, कॉन्फरन्स समन्वयक डॉ. संदीप पाटील यांच्यासह शहरातील अनेक डॉक्टर व मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

