*अक्षय कोठावदे*,*पिंपळनेर*
_धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय,माउंट आबू संचलित उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
_ या बाल संस्कार शिबिरासाठी 11 ते 16 या वयोगटातील मुलं आणि मुलींनी सहभाग घेतला.
_या बाल संस्कार शिबिरात परिसरातील मुल आणि मुलींचा उत्तम प्रतिसाद लाभला.
_पिंपळनेर या शहरात प्रथमच या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
_याप्रसंगी शिबिराच्या उत्तम नियोजनाचे पिंपळनेर सह परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इतर क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.

_बालपणात लहान मुलांवर “*राजयोगा मेडिटेशनच्या*” माध्यमातून उत्तम संस्कार घडावे आणि युवकांचे पुढील आयुष्य तणावमुक्त व्हावे हाच मुख्य उद्देश या ब्रह्मकुमारीज संस्थेचा आहे.
_या बालसंस्कार शिबिरात राजयोगा मेडिटेशन, अभ्यासातील एकाग्रता, व्यक्तिमत्व विकास, खेळ आणि स्पर्धा या मुख्य विषयांचा समावेश करण्यात आला होता.
_आजच्या 21 व्या शतकातील धकाधकीच्या जीवनातील तणावमुक्त जीवन जगण्यासाठी *सात दिवसीय निशुल्क राजयोगा मेडिटेशन कोर्स* करावा आणि आपले आयुष्य सुखी आणि आनंदी जगावे असे आव्हान पिंपळनेर ब्रह्मकुमारीज परिवारातर्फे करण्यात आले.
_या बालसंस्कार शिबिरात 66 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
_ या बाल संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारीजच्या साधकांनी मेहनत घेतली.

