**”आनंदी अंगण आरोग्य संपदा संगीतमय योगा” चा प्रथम वर्धापन दिन : भव्य आयोजन*
*नाशिक*— प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया अंतर्गत कार्यरत “आनंदी अंगण आरोग्य संपदा संगीतमय योगा” या उपक्रमाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी, 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी , 9,30 वाजता उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा विशेष कार्यक्रम गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात हॉल येथे आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आरोग्य, संगीत आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘आनंदी अंगण संगीतमय योगा’ या उपक्रमाने अल्पावधीतच अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. योगातून निरोगी जीवन, संगीतातून आनंद आणि अध्यात्मातून अंतःशांती हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन, सामुदायिक योगानुभव आणि ध्यानसत्र आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास ब्रह्माकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोगिनींचे आशीर्वाद लाभणार असून राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी (नाशिक जिल्हाप्रमुख), राजयोगिनी ब्रह्माकुमारी वीणा दीदी (संचालिका, इंदिरा नगर) आणि राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदीजी (मेरी, नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
“आरोग्य संपदा संगीतमय योगा” उपक्रमाचे प्रेरणास्थान व मुख्य प्रवर्तक डॉ. उज्ज्वलजी कापडणीस तसेच डॉ. मनीषा जी कापडणीस (डॉक्टर व मेडिटेशन तज्ञ) यांचे विशेष मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे. योग, ध्यान आणि संगीतमय साधनेच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य कसे साध्य करता येते, याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये महापौर, आमदार तसेच नगरसेवक व नगरसेविका यांचा समावेश आहे. विशेष आकर्षण म्हणून सामुदायिक संगीतमय योगाचा प्रत्यक्ष अनुभव, प्रेरणादायी यशोगाथा व अनुभव कथन, तसेच सामूहिक शांतिध्यान सत्र आयोजित करण्यात आले आहे.
हा उपक्रम काळे नगर, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, नाशिक येथील “आनंदी अंगण आरोग्य संपदा संगीतमय योगा” यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पावित्र्यास अनुसरून सहभागी नागरिकांनी पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या वेशभूषेत उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.“योगातून आरोग्य, संगीतातून आनंद, अध्यात्मातून शांती” हा संदेश देणारा हा वर्धापन दिन सोहळा नाशिककरांसाठी एक प्रेरणादायी आणि आरोग्यदायी पर्व ठरणार आहे. वा भाई खूप छान👌🏻👌🏻 सर्वांनी या आम्ही वाट बघतो . ओम शांती🙏🙏

