
नाशिक – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी Arogyasetu Lifecare Diagnostic Center (NVGT Care Services Pvt. Ltd. चा उपक्रम) यांच्या वतीने विशेष मेगा हेल्थ ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्व वैद्यकीय तपासण्यांवर तब्बल ५० टक्के सवलतीचा कूपन देण्यात येत असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष ऑफरमध्ये रक्त तपासणी, थायरॉईड, शुगर चाचणी, लिपिड प्रोफाइल, LFT, KFT, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 यांसह इतर सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजी तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सेंटरतर्फे देण्यात आली.
ही सवलत मिळवण्यासाठी संबंधित डिस्काउंट कूपन घेऊन प्रत्यक्ष डायग्नोस्टिक सेंटरला भेट देणे आवश्यक राहील. कूपनशिवाय सवलत लागू होणार नाही, अशी स्पष्ट सूचना आयोजकांनी दिली आहे.
Arogyasetu Lifecare Diagnostic Center हे नाशिक रोड परिसरातील त्रिवेणी पार्क, मंजुळा मंगल कार्यालयाजवळ, इंद्रप्रस्थ बिल्डिंग, शॉप नं. १४ व २२ येथे कार्यरत आहे. तपासणीसाठी पूर्वनोंदणी व अधिक माहितीसाठी +91-8421722250 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच www.arogyasetulifecarediagnostic.com या संकेतस्थळावर व info@arogyasetulifecarediagnostic.com, booking@arogyasetulifecarediagnostic.com या ई-मेलवरूनही माहिती व बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमामुळे नागरिकांना परवडणाऱ्या दरात तपासण्या करून घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

