डॉ कापडणीस कृत इंदिरानगर संगीतमय योगाग्रुपचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

नाशिक – इंदिरानगर येथील डॉक्टर कापडणीस कृत संगीतमय योगाग्रुपचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. उज्वल कापडणीस सर व डॉ. मनीषा कापडणीस यांनी रचलेला, संपूर्ण जगभर लोकप्रिय झालेला, अनेक आजारांवर रामबाण ठरलेला, ४० मिनिटे संगीतमय योगा आणि १० मिनिटे राजयोग ध्यान हा उपक्रम मागील वर्षे ब्रह्माकुमारी विना दीदींच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथील सिटी गार्डनमध्ये सुरू करण्यात आला होता. अवघ्या एका वर्षात या रोपट्याने वटवृक्षाचे रूप धारण केले. परिसरातील अडीचशे नागरिकांना याचा खूप फायदा झाला. दररोज दीडशे ते दोनशे भाऊ बहिणी याचा विनामूल्य आनंद घेतात..
जागतिक ध्यानधारणा दिवसाचे औचित्य साधून या संगीतमय योगा ग्रुपचा वर्धापन दिन ब्रह्माकुमारीच्या इंदिरानगर येथील शिवदर्शन भवन या सेवा केंद्रावर साजरा करण्यात आला. अनेक साधकांनी नृत्य, गीते आणि आनंददायी सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्माकुमारी संस्थेचे मुख्यालय माउंट आबू येथील बी.के. आत्मप्रकाश भाई,
स्थानिय मुख्य संचालिका वासंती दीदीजी, इंदिरानगर सेंटरच्या संचालिका विना दीदी, बी के उज्वला दीदी, बी के कावेरी दीदी, नाशिक रोड सेंटरच्या गोदावरी दीदी, वनी सेवा केंद्राच्या अनिता दीदी तसेच संगीतमय योगाचे प्रणेते डॉ. उज्वल कापडणीस व डॉ. मनीषा कापडणीस यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी शिवसत्य म्युझिकल योगा ग्रुप गंगापूर रोडचे चे सुमारे ६० साधक उपस्थित होते धुळे येथूनही मोठ्या संख्येने योगा ग्रुपचे साधक उपस्थित होते तसेच पाथर्डी फाटा ,उत्तम नगर, पवन नगर ,राणेनगर गोविंद नगर परिसरातूनही मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते. सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.पुढील वाटचालीसाठी महेश भाई खेडकर, महेश भाई सोनवणे, अवधूत भाई कुलकर्णी, डॉ. गुरुदेव बिरारी सर, उमा पराशर ताई,, अश्विनी पाटील इत्यादि इंदिरानगर ग्रुपमधील साधकांनी शुभेच्छा दिल्या..
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन महेश सोनवणे व सौ अनघा कोळपकर यांनी केले..पुढील वर्षात संपूर्ण नाशिक भरात याचा प्रचार प्रसार करून सगळ्यांचे जीवन सुखी शांत बनवू हा संकल्प केला. संपूर्ण जगासाठी ध्यानधारणेद्वारे सुख शांतीचे शक्तिशाली vibrations पसरवले आणि ईश्वर स्मृतीने ध्यान करून कार्यक्रमाचे सांगता झाली💐 त्यानंतर सर्वांनी प्रभू प्रसाद स्वीकार केला…

