इंदिरानगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
नाशिक (प्रतिनिधी) : परब नगर, इंदिरानगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात रौप्य महोत्सव २०२५ निमित्त सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा भव्य आणि भक्तिपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा दिव्य कार्यक्रम शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून भक्तांसाठी हा आध्यात्मिक आनंदाचा उत्सव ठरणार आहे.
या ज्ञानयज्ञाचे कथाकर प्रसिद्ध भागवताचार्य वेदमूर्ती पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी (नाशिक) यांच्या मुखातून होणार असून त्यांच्या प्रभावी व भावस्पर्शी वाणीमुळे श्रीमद् भागवत पुराणातील विविध प्रसंगांचे जिवंत दर्शन घडणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन दत्तकृपा सेवा समिती, परबनगर, इंदिरानगर, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांना सहपरिवार उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा आणि आत्मिक समाधान प्राप्त करावे.
संपर्कासाठी : श्री. दिलीप पाठक (गुरुजी) – ९८८११३२९७०, सौ. निलिमाताई गजानन उऱ्हेकर – ९६३७५६८४००.
श्रीमद् भागवत कथा म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम असून या श्रवणातून जीवनाचा खरा अर्थ उमगतो, असा संदेश आयोजकांनी दिला आहे.



